Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/10/2025
in राज्य
Reading Time: 1 min read
मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

मुंबई – (प्रतिनिधी) – राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पदाचा वर्षभराभरातील वेतन रक्कम रुपये ३१ लक्ष १८ हजार २८६ मा. मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत. त्याबाबतचे धनादेश व संमतीपत्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकी प्रसंगी सादर केले.

राज्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान तसेच राज्यातील विविध भागात महापुरामुळे झालेले नुकसान यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून नागरिकांना मदत करण्यात येत आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेट देऊन झालेल्या नुकसानीचे तसेच पाहणी केली आहे. मराठवाड्यातील जालना,बीड छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक, या जिल्ह्यांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी भेटी घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. संकटकळात नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे संकटमोचक म्हणून मंत्री गिरीश महाजन मदत करण्यात देखील संकटमोचक ठरले आहे.

आपला वर्षभराचा पगार देणारे ते राज्यातील पहिलेच मंत्री ठरले आहे. सद्याच्या मंत्री पदाची शपथ घेतल्या पासून डिंसेबर 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीचे संपूर्ण वेतन रु. ३१ लक्ष १८ हजार २८६ त्यांनी मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. अनेक सेवाभावी संस्था संस्था यांनी मुख्यमंत्री सहायता निधी दिले आहेत त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी देखील मानधन दिले आहे.

“ राज्यात मुसळधार पाऊस , तसेच महापुरामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केलेली आहे. राज्याच्या जनतेच्या व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर आहे, शासनाकडून त्यांना योग्य ती मदत मिळत असताना आपला देखील त्यामध्ये सहभाग असावा म्हणून माझ्या सद्याच्या मंत्री पदाच्या वर्षे भराचे एकूण पगार रु. ३१ लक्ष १८ हजार २८६ मा. मुख्यमंत्री सहायता निधीस देत आहे – ” श्री. गिरीश महाजन, मंत्री,जलसंपदा (तापी, कोकण व विदर्भ खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र राज्य.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माहिती अधिकार सप्ताह निमित्त ९ ऑक्टोंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन

Next Post

‘जलजीवन मिशन’च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

Next Post
‘जलजीवन मिशन’च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

'जलजीवन मिशन'च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo