Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मनपा सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात;मनपा घेते बघ्याची भुमिका

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मनपा सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात;मनपा घेते बघ्याची भुमिका

 सफाई कामगारांच्या आरोग्याच्या बाबतीत अधिकार्‍यांनी लावलाय काळा चष्मा 

जळगांव(चेतन निंबोळकर)- शहराला वैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासने लोकप्रतिनिधी व अधिकारी अनेक वेळा करत असतात. परंतु सफाई कामगारांचे राहणीमान सुधारावे याकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही. महानगरपालिका स्वच्छता विभागातील कचरावेचक आणि घंटागाडी कर्मचारी यांच्या आरोग्याच्या बाबतीत पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. महापालिका हद्दीतील घरोघरी, गल्लीबोळात घंटागाडी आपणास कचरा गोळा करताना दिसून येतात, पण स्वच्छता विभागातील या कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य मात्र धोक्यात आहे. सकाळी लवकर उठून हे कर्मचारी घंटागाडीसोबत कचरा, घाण गोळा करतात. कोणतेही हातमोजे, पायात रबरी बूट नसताना हे कर्मचारी ऊन-पावसात राबताना दिसून येतात. काम करताना घाण हातांच्या नखात जाते, त्याच हातांनी जेवण केल्याने अनेक दुर्धर संसर्गजन्य रोगाची लागण होण्याची शक्यता असते. दिवसाचे ८ ते १२ तास श्वास घेण्यासही त्रास होत असलेल्या कचऱ्यात राहिल्यामुळेच त्यांना व्यसने देखील लागली आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  कचरा हाताने वर्गीकरण केल्यामुळे सफाई कामगारांच्या हाताला, पायाला जखमा व खरूज होणे व खाज सुटणे तसेच घाणीच्या वासामुळे श्वसनाचे विकार जडले आहेत. त्यामुळे वयाच्या ४५ ते ५५ व्या वर्षीच सफाई कामगारांना भयंकर आजाराची लागण झाल्याचे दिसून येते. आपल्या परिसरातील साफसफाई  राखणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हातमोजे, टोपल्या व इतर अनेक प्रकारची सुविधा साधने महापालिकेने, तसेच संबंधित ठेकेदाराकडून देणे बंधनकारक असताना, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला घातक असतानाही कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळले जात आहे. या सफाई कामगारांना केरकचरा उचलताना कोणतीही सुविधा साधने नसताना काम करावे लागत आहे. सत्यमेव जयते ने काही सफाई कामगारांशी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की आमचे वरिष्ठ अधिकारी आमच्याकडे काही लक्ष देत नाहीत. आमच्या आरोग्याच्या दृष्टीने आमच्या सोई सुविधांकडे लक्ष देण गरजेचं आहे असं ही ते यावेळी म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

Next Post

विहित कालावधीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांचा समावेश काळ्या यादीत करावा- जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post
विहित कालावधीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांचा समावेश काळ्या यादीत करावा-     जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

विहित कालावधीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांचा समावेश काळ्या यादीत करावा- जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo