Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मराठा व कुणबी विद्यार्थ्यानी ‘सारथी’मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
मराठा व कुणबी विद्यार्थ्यानी ‘सारथी’मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, (जिमाका) दि. 3 – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेमार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी (अराजपत्रित) गट-ब (PSI-STI-ASO) पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण प्रायोजित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची जाहिरात सारथी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनेक होतकरु विद्यार्थी राज्यसेवेत आपले भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहतात.

परंतु अनेकवेळा आर्थिक पाठबळ व कोचिंग अभावी होतकरु व हुशार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या रिंगणातून बाहेर पडतात. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकवेळा आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण पूर्ण करु शकत नाहीत. त्यामुळे लक्षित गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्यसेवा क्षेत्रात सक्षम व उच्चशिक्षीत अधिकारी घडविण्याकरिता सारथीमार्फत एमपीएससी (अराजपत्रित) गट-ब (PSI-STI-ASO) ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आयोजित केले आहे.

या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी सारथी मार्फत 13 ऑगस्ट, 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले असून यासाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

पात्र उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड कागदपत्रे पडताळणीव्दारे करण्यात येईल.

तरी सारथी ने उपलब्ध करुन दिलेल्या नि:शुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असे आवाहन अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चा 10 वी CBSE चा 100% निकालाची परंपरा कायम

Next Post

कोकण पूरग्रस्तांसाठी एरंडोल तालुका मराठी पत्रकार संघातर्फे मदतफेरी ;शहरातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo