Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरणासह विविध घटकांसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरणासह विविध घटकांसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात


जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) – सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत अन्नधान्य पिके, व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 20 मे, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 20 मे, 2021 पर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच यासाठी विचार केला जाणार असल्याचे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके, व व्यापारी पिके कार्यक्रमातंर्गत जळगाव जिल्ह्यात कडधान्य, भरडधान्य (मका), पौष्टिक तृणधान्य, व्यापारी पिके (कापूस) राबविण्यात येतो.
बियाणे वितरण – कडधान्य बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास रु 50/- प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास रु. 25/- प्रती किलो, संकरीत मका व बाजरी बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास रु. 100/- प्रती किलो, ज्वारी व बाजरी सरळ वाणाचे बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास रु 30/- प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास रु. 15/- प्रती किलो एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
पीक प्रात्यक्षिके – पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार रु. दोन ते चार हजार रुपये प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.
बियाणे मिनिकिट – सोयाबीन/बाजरी/ज्वारी/कापूस/मका या पिकांमध्ये मिनिकिट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे. जळगाव जिल्ह्याकरीता तूर, मुग या पीकाची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2021 मध्ये तूर, मुग आणि उडीद यापैकी एका पिकाचे 4 किलोचे एक बियाणे मिनिकीट देण्यात येईल. तूर 412/- रुपये प्रती 4 किलो मिनिकीट, मुग -407/- रुपये प्रती 4 किलो मिनिकीट, उडीद 349/- रुपये प्रती 4 किलो मिनिकीट प्रमाणे अनुदान देय राहील. बियाणे मिनिकीटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांनी अदा करावयाची आहे. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑटोरिक्षात पारदर्शक पडदे लावण्याचे आवाहन

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेची रक्कम शेतकऱ्यांची खात्यावर हस्तांतरीत – कृषि आयुक्त धीरजकुमार

Next Post
प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेची रक्कम शेतकऱ्यांची खात्यावर हस्तांतरीत – कृषि आयुक्त धीरजकुमार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेची रक्कम शेतकऱ्यांची खात्यावर हस्तांतरीत - कृषि आयुक्त धीरजकुमार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d