Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महादेवभाई बहुआयामी व्यक्तीत्व व परिपूर्ण सेक्रेटरी होते- डॉ. प्रभा रविशंकर

गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
18/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
महादेवभाई बहुआयामी व्यक्तीत्व व परिपूर्ण सेक्रेटरी होते- डॉ. प्रभा रविशंकर

जळगाव दि.१८ (प्रतिनिधी) – परिपूर्ण सेक्रेटरी कसा असावा याचे आदर्श उदाहरण बघायचे झाले तर ते महात्मा गांधीजींचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई यांचे घेता येईल. थोर विचारवंत, लेखक व प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक महादेव देसाई हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सोबत आयुष्यभर सावलीसारखे राहिले. या २५ वर्षांच्या काळात त्यांनी लेखन केलेल्या डायरीतून महात्मा गांधींच्या जीवनातील महत्त्वाच्या नोंदी, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख घटनांबाबत संदर्भ आजही बघायला मिळतात याबाबतची माहिती एस.एन.डी.टी युनिव्हर्सिटीच्या इतिसाहाच्या प्रोफेसर तथा जीआरएफ रेसिडेंशिअल फेलो डॉ. प्रभा रविशंकर यांनी उपस्थितांना सांगितली. ‘महादेव देसाई अ कंप्लेट सेक्रेटरीयट’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे डॉ. सुदर्शन आयंगार, अंबिका जैन आणि डीन डॉ. गीता धर्मपाल यांची उपस्थिती होती.

आरंभी डॉ. प्रभा रविशंकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा परिचय गीता धर्मपाल यांनी करून दिला.

डॉ. प्रभा यांनी महादेवभाई देसाई यांच्याबाबत सांगितले की, त्यांचे बहुआयामी व्यक्तीत्व होते. त्यांचे हस्ताक्षर सुंदर होते, भाषेवर प्रभुत्व होते ते चांगले भाषांतरकार होते. त्यांच्या लेखनात फारच अचूकता असे, इतकी अचूकता स्वल्पविरामाची चूक होत नसे. महात्मा गांधीजी आणि त्यांच्या संबंधाबाबत अनेक प्रसंगही त्यांनी श्रोत्यांसमोर सांगितले. १९१७ ते १९४२ अशी २५ वर्षे त्यांनी महात्मा गांधीजींची समर्पित सेवा केली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान कसे महत्त्वपूर्ण होते याबाबतचा त्यांचा पैलू त्यांनी सांगितला.

चंपारण सत्याग्रहाचा प्रसंग आणि पुरीच्या जगन्नाथ मंदिरात महादेवभाई देसाईंनी जाणे या दोन कारणांमुळे झालेले त्यांच्यातील मनमुटाव या प्रसंगाबाबतही त्यांनी उपस्थितांना सांगितले. महादेवभाई एक मल्टी टॅलेंट व्यक्तीमत्व होते. ते मुगल गार्डन मधील एक गुलाब होय असे वर्णन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपले समाधान करून घेतले. यावेळी नाट्यकर्मी रमेश भोळे, डॉ. प्रभा यांचे पती रविशंकर, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी, पीडी, पीजी डिप्लोमाचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुदर्शन आयंगार यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मिश्रा यांनी केले.

Team Satymev Jayate

Previous Post

विद्यापीठात आता सूर्याची वीज, सौर ऊर्जा प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

आगामी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे :- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo