Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महापौरांनी शेवटच्या दिवशीही घेतली रुग्ण, लसीकरणाची माहिती!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महापौरांनी शेवटच्या दिवशीही घेतली रुग्ण, लसीकरणाची माहिती!

रुग्ण, नागरिकांशी साधला संवाद : दररोज ३५० वर नागरिकांना दिली जाते लस

जळगाव, दि.१६ – शहर मनपाच्या मावळत्या महापौर सौ.भारती सोनवणे यांनी शेवटच्या दिवशी देखील मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात जाऊन लसीकरणाची माहिती घेतली. तसेच मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस करीत त्यांच्याशी संवाद देखील साधला. महापौर पदाचा शेवटचा दिवस असला तरीही महापौर सौ.भारती सोनवणे यांनी आपले कर्तव्य बजावण्यात कोणतीही कसूर केली नाही.

जळगाव शहराच्या विद्यमान महापौर सौ.भारती सोनवणे यांचा कार्यकाळ दि.१८ मार्च रोजी संपणार आहे. गेल्या वर्षभर कोरोना काळात दिवसरात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या महापौर सौ.भारती सोनवणे या शेवटच्या दिवशी देखील जनसेवा करण्यात व्यस्त होत्या. जळगाव मनपात महापौर पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर सौ.भारती सोनवणे यांनी छत्रपती शाहू महाराज मनपा रुग्णालयात जाऊन लसीकरणाची माहिती घेतली. जेष्ठ नागरिक आणि पहिल्या फळीतील नागरिकांशी चर्चा करून त्यांनी तब्येतीची विचारपूस केली.

कोविड सेंटरला केली पाहणी


महापौर सौ.भारती सोनवणे यांनी नेहमीप्रमाणे दुपारी कोविड सेंटरला भेट देत रुग्णांशी संवाद साधला. कोविड सेंटरमधील सोयसुविधांची माहिती घेतली. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पत्रकाराला केलेल्या मारहाणी बाबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे चाळीसगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले निवेदन

Next Post

परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Next Post
परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo