Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महापौर भारती सोनवणेंकडून शहरातील विकासकामांची पाहणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

ठेकेदारांना दिल्या सूचना : लवकरात लवकर कामे करण्याची ताकीद

जळगाव – शहरात अनेक ठिकाणी रखडलेल्या विकास कामांना पुन्हा सुरूवात झाली आहे. बुधवारी महापौर भारती सोनवणे यांनी मनपा अधिकार्‍यांसह विविध प्रभागात जावून विकास कामांची पाहणी केली. यावेळी ठेकेदारांना सूचना देत कामे लवकरात लवकर पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची ताकीद देखील त्यांनी दिली.
सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेला पाहणी दौरा दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होता. यावेळी महापौर भारती सोनवणे यांच्यासोबत नगरसेवक कैलास सोनवणे, प्रतिभा देशमुख, प्रतिभा पाटील, डॉ.चंद्रशेखर पाटील, मयुर कापसे, सुधीर पाटील, मनोज काळे, मनपा शहर अभियंता सुनील भोळे, बांधकाम अभियंता योगेश वाणी, पाणी पुरवठा अभियंता नरेंद्र जावळे आदी उपस्थित होते.

तात्पुरता रस्ता तयार करण्याच्या सूचना

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने शिवाजीनगर हनुमान मंदिराकडून रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्या मार्गाने होणारी वाहतूक वखारीकडून होत आहे. दरम्यान, त्याठिकाणी रस्ता खोदलेला असल्याने दिवसभर मोठ्याप्रमाणावर नागरिकांना धुळीचा सामना करावा लागतो. महापौर भारती सोनवणे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्याने वळणावर तात्पुरता 7 मीटरचा डांबरी रस्ता करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

गटारींच्या कामात गुणवत्ता राखा

द्वारका नगर, पिंप्राळ्यातील श्रीराम समर्थ कॉलनी, घनश्याम नगर, आरएमएस कॉलनी परिसरातील गटारींच्या कामांचा महापौर भारती सोनवणे यांनी आढावा घेतला. मनुदेवी सोसायटी परिसरातील वृदांवन अपार्टमेंटलगत एका मोकळ्या प्लॉटवर परिसरातील सर्व सांडपाणी साचत असल्याने खदाणप्रमाणे मोठे डबके साचले आहे. महापौर भारती सोनवणे यांनी त्याठिकाणी पाहणी करून संबंधित जागा मालकाला मनपा प्रशासनाकडून नोटीस पाठवण्याची सूचना केली.

उद्यानांच्या सुशोभिकरणाची पाहणी

मुक्ताईनगर परिसरात ऑक्सिजन पार्क साकारण्यात येत असून त्याठिकाणी महापौर भारती सोनवणे यांनी पाहणी केली व उद्यानाला लवकरात लवकर संरक्षण जाळी आणि प्रवेशद्वार बसविण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच हायवेदर्शन कॉलनी आणि खोटेनगरातील उद्यानाच्या कामाचा देखील त्यांनी आढावा घेतला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आय एम आर मध्ये आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान

Next Post

विद्यार्थ्यांनी घेतले कराटे प्रशिक्षण

Next Post

विद्यार्थ्यांनी घेतले कराटे प्रशिक्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d