Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.उल्हास पाटील

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
27/08/2021
in राजकारण
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.उल्हास पाटील

जळगाव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी गुरुवारी जाहिर करण्यात आली. यात काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची पुन्हा एकदा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. डॉ.उल्हास पाटील यांच्या निवडीमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आक्रमक चेहरा म्हणून आमदार नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सूत्रे सोपविण्यात आली. प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी जिल्हानिहाय दौरे करुन संघटनात्मक आढावा घेतला. गुरुवारी दि.२६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली, या बैठकीत प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नूतन कार्यकारिणीवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले, त्यास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने मंजूरी दिल्यानंतर हि कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे.

यात १८ उपाध्यक्ष, ६५ सरचिटणीस आणि १०४ चिटणीस अशी जंबो कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.जळगाव जिल्ह्याला प्रदेशावर मान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीत जळगाव जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी निवडणूकांच्या दृष्टीने डॉ.उल्हास पाटील यांची नियुक्‍ती महत्वाची मानली जात आहे. काँग्रेसला पुन्हा गत वैभव मिळवून देणार – डॉ.उल्हास पाटील

जळगाव जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्‍ला राहिला आहे. आगामी निवडणूकामध्ये काँग्रेस पक्षाला अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्ता जोडो अभियान राबविण्यात येणार आहे. गाव तेथे काँग्रेस हि संकल्पना घेऊन काँग्रेसला पुन्हा गत वैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न राहिल अशी ग्वाही नवनियुक्‍त प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी दिली.

Team Satymev Jayate

Previous Post

‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

Next Post

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांसाठी रोजगार संधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo