Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांना मोफत रेनकोट छत्री वाटपाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/07/2022
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read

पाचोरा – (प्रमोद सोनवणे) – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ खान्देश विभागातर्फे पाचोरा येथे दिनांक 29 जुलै रोजी पत्रकारांना संघटनेमार्फत मोफत रेनकोट व छत्री वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे.


पत्रकारांना सोबत घेऊन संघटित पत्रकारांवर होणारे अन्याय अत्याचार यावर लढा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना नेहमीच तत्पर असते. राज्य पत्रकार संघाचे 40 हजार सभासद असलेली एकमेव संघटना आतापर्यंत सर्वात जास्त सभासद संख्या असलेली संघटना म्हणून कमी दिवसात या संघटनेची संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. वेळोवेळी समाजाभिमुख कार्यक्रम घेत एक नवी भरारी या संघटनेने घेतली आहे या संघटनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप पत्रकारांना हेल्मेट वाटप पत्रकारांचा विमा काढणे असे विविध कार्यक्रम या संघटनेने आजपर्यंत घेतलेले आहेत या संघटनेमार्फत खान्देश विभागात पाचोरा भडगाव चाळीसगाव व पारोळा या चार तालुक्यातील पत्रकारांना पाचोरा येथे दिनांक 29 जुलै शुक्रवार रोजी शक्ती धाम मंगल कार्यालय भडगाव रोड पाचोरा येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे , राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, विभागीय अध्यक्ष तथा जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे ,खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या सह पत्रकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे.


या कार्यक्रमाचे उद्घाटक अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे उपविभागीय प्रांताधिकारी विक्रम बांदल, लक्ष्मीकांत साताळकर उपविभागीय प्रांताधिकारी चाळिसगांव, कैलास चावडे तहसीलदार पाचोरा, मुकेश हिवाळे भडगाव तहसीलदार, अमोल मोरे चाळीसगाव तहसीलदार, किसनराव नजन पाटील पो निरीक्षक पाचोरा , अशोक उतेकर पो निरीक्षक भडगाव, प्रताप इंगळे पो निरीक्षक पहूर, के .के. पाटील पो निरीक्षक चाळीसगाव,संजय ठेंगे पो निरीक्षक चाळीसगाव ग्रामिण, भागवत पाटील पो निरीक्षक नॅशनल हायवे चाळीसगाव तुषार देवरे पो निरीक्षक वाहतूक शाखा चाळीसगाव , विष्णू आव्हाळ पो निरीक्षक मेहूनबारे यांच्यासह पोलीस प्रशासनाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थिती देणार आहेत .या कार्यक्रमाला पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित द्यावी असे आवाहन संघटनेचे खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, पाचोरा तालुका अध्यक्ष शांताराम चौधरी, भडगाव तालुका अध्यक्ष गणेश रावळ, पारोळा तालुका अध्यक्ष ,बाळू पाटील , चाळीसगाव तालुका अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० रोजी “नाट्य संगीत रजनी” कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांना म्हसावद बोरणार गटातून मोठी पसंतीची चर्चा

Next Post

ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांना म्हसावद बोरणार गटातून मोठी पसंतीची चर्चा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo