Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत पुण्याचा आरूष देशपांडे विजयी; मुलींमध्ये सांगलीची भार्गवी भोसले विजयी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/11/2024
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत पुण्याचा आरूष देशपांडे विजयी; मुलींमध्ये सांगलीची भार्गवी भोसले विजयी

जळगाव – (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनतर्फे २३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते ही स्पर्धा सुहाना टेन सर्किट यांनी प्रायोजित केली होती. जळगाव येथे झालेल्या स्पर्धेत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, संभाजीनगर, धुळे, नागपूर, अमरावती व जळगाव येथील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. यात पुण्याचा आरुष देशपांडे विजयी झाला तर जळगावचा इवान जैन हा उपविजेता ठरला. मुलींमध्ये सांगलीची भार्गवी भोसले ही विजेती तर धुळ्याची निधी पाटील ही उपविजयी झाली. महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचा आज उपपोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक प्रवीण गायसमुद्रे, जळगाव जिल्हा लॉन टेनिसचे अध्यक्ष रमेशदादा जैन, सदस्य प्रवीण पटेल, राधेश्याम सोनवणे, स्पर्धा संचालक कृपालसिंह ठाकूर, अरविंद देशपांडे हे उपस्थित होते. पोलीस उपाधीक्षक संदीप गावीत यांनी या स्पर्धा जळगाव येथे आयोजित केल्या याबाबत असोसिएशनचे अभिनंदन केले व पोलीस मैदानावरील या टेनिस कोर्ट वर अशाच प्रकारच्या स्पर्धा भविष्यात आयोजित केल्यास पोलीस विभाग त्यास संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासित केले.

काल झालेल्या स्पर्धेतून मुलींमध्ये निधी पाटील धुळे विजयी विरुद्ध हर्दिनी त्रिभुवन यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला व निधी पाटील ६-२ असा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला तर दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामन्यात सांगलीच्या भार्गवी भोसले तिने जळगावच्या आरूध्या नाथानी तिच्यावर ६-१ असा विजय नोंदवून अंतिम फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या अंतिम फेरीत भार्गवी भोसले तिने धुळ्याच्या निधी पाटील वर ६-१ असा विजय मिळवला अंतिम सामना जिंकून विजयी करंडकावर आपले नाव कोरले. मुलांच्या उपांत्य फेरीत आरुष देशपांडे याने दोहाद कसले याच्यावर ६-२ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला तर तर दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात जळगावच्या ईवांन जैन याने आदित्य उपाध्ये याच्यावर ६-४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अतितटीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या आरुष देशपांडे याने इवान जैन याच्यावर ४-१ व ५-४ (टायब्रेक ७-३) असा विजय मिळवत विजयी ट्रॉफी आपल्या नावे केली.

या स्पर्धेत तीर्थ पटेल, यश पाटील, हर्षित पटेल, घनश्याम कोळी, देव ठाकूर, सनय नाथानी, प्रतीक हरीमकर व जिनीशा मंधान यांनी पंच म्हणून काम पाहिले. यशस्वीतेसाठी पवन पाटील, विनय मिश्रा, प्रकाश दांडेकर, राहुल चौधरी, महादेव पळासकर, तनवीर पठाण, सुभाष घोडेस्वार यांनी तसेच पोलीस विभागातील सहकाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन आफ्रिन खान हिने केले. आभार रमेशदादा जैन यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पुरातन सीतान्हाणी पानपोई वास्तूची साफसफाई;जागतिक वारसा सप्ताह निमित्त सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

Next Post

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम येवून पटकावले सुवर्ण पदक

Next Post
निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम येवून पटकावले सुवर्ण पदक

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम येवून पटकावले सुवर्ण पदक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo