Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे शासनाकडे निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव (प्रतिनिधी) -महाराष्ट्र राज्यमान्य शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात महासंघाचे राज्य सहसचिव अशोक मदाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली.त्यात बैठकीनंतर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने सूचित केल्याप्रमाणे शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी वामन कदम यांना देण्यात आले.

निवेदनातील महत्वाच्या मागण्या 


1) नवीन अंशदाई पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागु करावी.
2)शिक्षक भरतीसाठी असलेली टी. ई. टी. ची अट रद्द करून सरळ शिक्षक भरती करण्यात यावी.
3) शिक्षण सेवक धोरण रद्द करून शिक्षकांची स्थायी नियुक्ती करण्यात यावी.
4) शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात यावी.
5) केंद्र सरकार द्वारा देण्यात येणारा निधी प्राथमिक शिक्षणावरच खर्च करण्यात यावा.
6)शिक्षकांना वैद्यकीय भत्ता सुरू करावा.
7) प्राथमिक शिक्षकांना विधान परिषदेवर मतदानाचा अधिकार मिळावा.
8) प्राथमिक शाळेत स्वतंत्र मुख्याध्यापकासोबत एक महिला मदतनीस , लिपिक व शिपाई यांची भरती करण्यात यावी.
9) संपूर्ण देशात सेवानिवृत्ती चे वय एकच असावे.
10) शिक्षकांना अध्यापनाच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम देऊ नये.
             या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांचे निवेदन मा.नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार ,मा.रमेशजी पोखरियाल मानव संसाधन विकास मंत्री ,भारत सरकार , मा.आशिषजी शेलार ( शालेय शिक्षण मंत्री ,महाराष्ट्र राज्य मुंबई) यांच्या पर्यंत पोहचवण्यात येईल असे अश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी मा.वामन कदम यांचेकडून देण्यात आले.
प्रसंगी महाराष्ट्र राज्यमान्य शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे राज्य सहसचिव अशोक मदाने ,  महाराष्ट्र राज्य सदस्य टी. के.पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष हेमंत पाटील , जळगाव जिल्हा सचिव देवेंद्र चौधरी , भाऊलाल राठोड , श्याम ठाकरे , राकेश पाटील , दीपक टोके , गोविंदा लोखंडे , अजित चौधरी , प्रफुल्ल सरोदे , हेमंत धांडे , महेंद्र चौधरी ,पवार सर , दिलीपसिंग पाटील तसेच सर्व तालुका अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सचिव तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अल्पवयीन मुलींच्या अत्याचार विरोधी जनआक्रोश मोर्चा

Next Post

जैन इरिगेशनच्या कलाविभागातर्फे फोटोग्राफी दिवस साजरा

Next Post

जैन इरिगेशनच्या कलाविभागातर्फे फोटोग्राफी दिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo