Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा पहिला स्थापना दिना निमित्त उत्तर महाराष्ट्रातील जळगाव विभागात संघटनेचा विस्तार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा पहिला स्थापना दिना निमित्त उत्तर महाराष्ट्रातील जळगाव विभागात संघटनेचा विस्तार

जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासू) या अराजकीय संघटनेचा पहिल्या  स्थापना दिना निमित्त सर्व उत्तर महाराष्ट्रच्या जिल्हा प्रतिनिधी व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सहकारी मेळावा संपन्न झाला. या सहकारी मेळाव्यामधे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत येणारे जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांचा विस्तार करुन जवळपास ६० जणांना पदग्रहण करुन जबाबदारी देण्यात आली यावेळी सदस्यतेची शपथ सुद्धा दिली गेली याप्रसंगी नियुक्ती पत्राचे वाटप मासूचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव विभाग प्रमुख म्हणून अ‍ॅड.अभिजित रंधे, जळगाव जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, धुळे जिल्हाध्यक्ष राहुल माळी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष आकाश वळवी तसेच औरंगाबाद आणि हिंगोली जिल्हाध्यक्षपदी अनुक्रमे डॉ.रवींद्र क्षीरसागर व अ‍ॅड. जाकीर सय्यद या सर्वांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमाच्या वेळी विचार मंचावर क.ब चौ.उ.म.वि. विद्यार्थी कल्याण विभागाचे माजी संचालक, प्रा.डॉ.सत्यजित साळवे, प्रा.राणे बेंडाळे महाविद्यालय, शिक्षण क्रांतीचे प्रा.नितीन घोपे तसेच उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अरुण चव्हाण आणि मासूचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सुनील प्रताप देवरे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी चळवळ कशी उभारावी त्यानुषंगाने विद्यार्थी हितासाठी प्रभावी कार्य कसे करावे, विद्यार्थी चळवळ किती महत्वाची आहे याची जाणीव पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य डोळ्यांसमोर ठेवून कार्य करावे हा महत्वाचा संदेश पदाधिकाऱ्यांना दिला. उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण चव्हाण यांनी मेळाव्याची सुरवात भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणून सुरु केली तसेच अ‍ॅड.अभिजीत जितेंद्र रंधे यांनी मेळाव्याची प्रस्तावना सादर केली आणि जळगाव जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी आभार प्रदर्शन करुन मेळाव्याची सांगता केली. मासूचे जळगाव विभागाचे विद्यार्थी कार्य अ‍ॅड.अभिजीत जितेंद्र रंधे आणि जिल्हा रोहन महाजन यांच्या नेतृत्वात सुरु आहे व या कार्याला आता गती प्रदान होत आहे. असंख्य विद्यार्थी मासूकडे अपेक्षेने पाहत असुन विद्यार्थी चळवळीला नवीन आयाम देण्यासाठी मासूत कार्य करण्यास मोठया संख्येने सहभागी होण्यास तत्पर आहे. मासू पुढील काळात महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अग्रगण्य विद्यार्थी संघटना म्हणून गणली जाईल अशी आशा यावेळी मासूचे उपाध्यक्ष अ‍ॅड.सुनील प्रताप देवरे यांनी व्यक्त केला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

रानडुकराची शिकार करणाऱ्या दोघांना वन कोठडी

Next Post
रानडुकराची शिकार करणाऱ्या दोघांना वन कोठडी

रानडुकराची शिकार करणाऱ्या दोघांना वन कोठडी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d