Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाशक्तीच्या साक्षीने रक्तदान करून अनिल चौधरींनी दाखल केला उमेदवारी अर्ज!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/10/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
महाशक्तीच्या साक्षीने रक्तदान करून अनिल चौधरींनी दाखल केला उमेदवारी अर्ज!

रावेर-यावल मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्ष, परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार

रावेर-(प्रतिनिधी) – रावेर-यावल मतदार संघाचा विकास गेल्या ४० वर्षापासून रखडला असून पिढीजात वारसा आणि खोट्या आश्वासांना मतदार आता कंटाळले आहेत. मतदारांना परिवर्तनाची आस असून यंदा परिवर्तन घडणारच आहे. सर्व समाजातील महाशक्तीच माझी खरी ताकद असून रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत मी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे अनिल चौधरी यांनी सांगितले.

प्रहार जनशक्ती पक्ष, परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी मोठे शक्ती प्रदर्शन न करता सामाजिक संदेश देत रक्तदान करून शेतकरी, दिव्यांग, कामगार, महिला, तरुण यांनासोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज रावेर तहसीलदार यांच्याकडे दाखल केला.

रावेर-यावल विधानसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले अनिल छबिलदास चौधरी यांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान संदेश देत सोमवारी शहरातील यशवंत विद्यालयासमोर रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात रक्तदान करून त्यांनी इतरांना देखील रक्तदान करण्यासाठी आवाहन केले. मोठी मिरवणूक न काढता आगळ्यावेगळ्या पद्धतीने अनिल चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वत्र त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.

रक्तदान शिबिर आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना गणेश बोरसे, इरफान शेख, अभिमन्यू चौधरी, दिलीप वाणी, तुकाराम बारी, शुभम पाटील, करीम मण्यार, दिलीप बंजारा, नंदकिशोर सोनवणे, पिंटू धांडे, योगेश निकम, भरत लिधुरे, राकेश भंगाळे, वसीम शेख, सचिन महाजन, सचिन झाल्टे, विकास पाटील, फिरोज शेख, हकीम खाटीक यांची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतमाता,वंदेमातरमच्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

गुलाबराव पाटलांना कानळदा, आव्हाणे, खेडी, फुपनगरी, नांद्रा परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद !

Next Post
गुलाबराव  पाटलांना कानळदा, आव्हाणे, खेडी, फुपनगरी, नांद्रा परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद !

गुलाबराव पाटलांना कानळदा, आव्हाणे, खेडी, फुपनगरी, नांद्रा परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo