Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मातृदिन अंगणवाडी सेविकांना अर्पण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मातृदिन अंगणवाडी सेविकांना अर्पण

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून राज्यातील माता-भगिनींना मातृदिनाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ९ : राज्यातील सर्व माता-भगिनींना मातृदिनाच्या शुभेच्छा देताना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या वर्षीचा मातृदिन अंगणवाडी सेविकांना समर्पित केला आहे. त्यासाठी त्यांनी एक अभंगपर कविता रचली आहे.

कोरोना परिस्थितीमध्ये महिला व बालविकास विभाग लहान बालके, गर्भवती, स्तनदा माता यांच्या पोषण आहाराची तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. राज्यातील 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील सुमारे 57 लाख 10 हजार बालके आणि 11 लाख 26 हजार गर्भवती, स्तनदा माता आणि किशोरी योजनेतील किशोरवयीन मुलींपर्यंत पूरक पोषण आहार (टेक होम रेशन) घरपोच वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही बालके व महिलांच्या पोषणावर विपरीत परिणाम झाला नाही. हे अंगणवाडी सेविकांच्या मेहनतीचे यश आहे. हे सर्व काम आरोग्यविषयक आवश्यक ती दक्षता घेत तसेच योग्य सुरक्षित अंतर (फिजिकल डिस्टंसिंग) राखत केले जात आहे. एकूणच महिला व बालविकास विभाग राज्यातील बालके आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपत्ती कालावधीतदेखील उत्कृष्टरित्या काम करत आहे.

ॲड. ठाकूर यांनी केलेली कविता –

माझ्या अंगणवाडी सेविकांनो, कामे करता तुम्ही।

त्याने प्रसन्न होई माय, प्रसन्न होई मायभूमी।।

माय सांगे लेकरा, नका जाऊ बाहेरा।

ऐका आईचे जरा, ठेवा करोना दूरा ।।

मातेचा मायेचा हात, प्रेमाचा मोठा स्त्रोत।

वारंवार धुवा हात, करू करोना वरी मात।।

आई धरे पोरा अंतरी, उभे रहा योग्य अंतरी।

संदेश हा यशोमतीचा, महिला बाल कल्याणाचा।।

करुया माय वंदना, करुया दूर करोना।

करुया माय वंदना, करुया दूर करोना।।

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नफेखोरी करणाऱ्या मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा

Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo