Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मानव अधिकार दिनानिमित्त तर्सोद येथे जनजागृती रॅली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/12/2024
in जळगाव
मानव अधिकार दिनानिमित्त तर्सोद येथे जनजागृती रॅली

जळगाव — गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन एन एस) विभागातर्फे तर्सोद (जळगाव) येथे मानव अधिकार दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीद्वारे नागरिकांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्यात आली.मानवाचे मूलभूत हक्क, सन्मान आणि सामाजिक न्याय याविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तर्सोद परिसरात फलक, घोषवाक्ये आणि संदेशांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवली. रॅलीत १०० हून अधिक (एन एन एस) स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.या उपक्रमाच्या माध्यमातून तर्सोदमधील नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देण्यात आली आणि समाजामध्ये समानता आणि न्यायाचे महत्त्व पटवून दिले.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणविर, (एन एन एस) समन्वयक प्रा. निम्मी वर्गीस, प्रा. आश्लेषा मून, प्रा. रितेश पडघन व प्राध्यापक मंडळींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, मानव अधिकार दिनानिमित्त अशी जनजागृती रॅली समाजाला सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वाची ठरेल.या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. गुणवंतराव सारोदे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास भेट

Next Post

जना स्मॉल फायनान्स बँक यांच्यातर्फे शुद्ध पाण्याचे वाटर फिल्टर चे वितरण

Next Post
जना स्मॉल फायनान्स बँक यांच्यातर्फे शुद्ध पाण्याचे वाटर फिल्टर चे  वितरण

जना स्मॉल फायनान्स बँक यांच्यातर्फे शुद्ध पाण्याचे वाटर फिल्टर चे वितरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo