Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मानव विकास मिशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील महिला बचत गट प्रदुषण नियंत्रण मंडळास पुरविणार 20 हजार कापडी पिशव्या

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
मानव विकास मिशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील महिला बचत गट प्रदुषण नियंत्रण मंडळास पुरविणार 20 हजार कापडी पिशव्या


जळगाव, दि. 1 (जिमाका) – महिला आर्थिक विकास महामंडळ, जळगाव, जिल्हा नियोजन विभाग, जळगाव यांच्यामार्फत मानव विकास मिशन कार्यक्रम जिल्ह्यातील मुक्ताईनगर, एरंडोल, जामनेर या तीन तालुक्यातील राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील बचत गटातील महिलांसाठी कार्यरत लोक संकलीत साधन केंद्राच्या माध्यमातून या तालुक्यात कापडी पिशवी युनिट सुरु करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांतर्गत युनिटला इंडस्ट्रियल मशीन, कापड कटींग मशीन, स्क्रीन प्रिंटिंग मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे .
कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना रोजगार व काम मिळावे, या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या मदतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्याकडून या युनिटला काम देण्यात आले असून त्यांच्याकडून वीस हजार कापडी पिशवी शिवून घेतल्या जाणार आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर, एरंडोल व जामनेर या ती युनिटमधील 90 महिलांकडून या पिशव्या शिवून घेण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ बौद्धपौर्णिमेच्या दिवशी कोरोनाचे नियम पाळून या महिलांनी आपआपल्या युनिटमध्ये करुन कामास सुरुवात केली. या महिलांना एका पिशवीसाठी चार रुपये प्रति पिशवी इतका मेहताना मिळणार असून लॉकडाऊन व कोरोनाच्या काळात त्यांना घरातच काम उपलब्ध झाल्याने रोजगार मिळणार असल्याने या महिलांनी आनंद व्यक्त केला.
मानव विकास मिशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील तीनही युनिट लवकरात लवकर सुरू करता यावे, याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा नियोजन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची मदत मिळाली असून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांचीही वेळोवेळी मदत व मार्गदर्शन लाभल्याचे महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी शेख अतिक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

म्युकरमायकोसिसला घाबरू नका! लवकर निदान झाल्यास आणि योग्य औषधोपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो-डॉ श्वेतल महाजन -चोपडे (नाक कान घसा तज्ञ)

Next Post

भडगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वतीने आंदोलन;मागास प्रवर्गातील पदोन्नती मध्ये आरक्षण कायम करा

Next Post

भडगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वतीने आंदोलन;मागास प्रवर्गातील पदोन्नती मध्ये आरक्षण कायम करा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo