Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मानसीच्या परिवाराला पोलीस संरक्षण देण्यात यावे- महाराष्ट्र अंनिसची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी)-येथील कंजारभाट समाजाच्या जात पंचायतीने पिडीत व मयत मानसी बागडे आत्महत्याप्रकरणी तक्रारदार त्यांच्या आई बानो आनंद बागडे यांच्या परिवाराला जात पंचायतीच्या पंच व संबंधितांकडुन निर्माण दहशत निर्माण झाली आहे. झालेल्या दहशतीमुळे व जीवीतास संभाव्य धोक्यासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगाव यांनी शनिवारी निवेदनाद्वारे केली आहे. 

जळगाव येथील मानसी बागडे या युवतीने कंजरभाट जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून दिनांक २३ जानेवारी  रोजी गळफास लावुन आत्महत्या केली होती. परंतु, कंजारभाट जात पंचायतीच्या समाजावरील अर्निबंध नियंत्रणामुळे व जबर दहशतीमुळे आत्महत्या केलेल्या मानसी बागडेच्या आई बानो आनंद बागडे यांनी आत्महत्येची माहिती प्रथम तपास नोंदीच्या वेळी लपवून ठेवली होती.

महाराष्ट्र अंनिसने केलेल्या विधायक हस्तक्षेपामुळे जात पंचायतीच्या दबावात अंत्यविधी उरकण्यापूर्वी मानसी बागडेच्या मृत शरीराचे शव विच्छेदन केल्यानंतर तिने गळफास लावुनच आत्महत्या झाल्याचे सिध्द झाले आहे. त्यानंतर केलेल्या प्रशासकीय पाठपुराव्यातुन आणि राज्यस्तरीय वरीष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनामुळे पोलीसांकडुन मिळालेल्या सहकार्यातुन काल दिनांक ३१ जानेवारी रोजी बानो आनंद बागडे यांच्याकडून कंजरभाट जात पंचांच्या विरोधात पुरवणी जबाब  नोंदविण्यात आला आहे.

मात्र जात पंचांशी संबंधित नातेवाईक व इतर बानो आनंद बागडे यांच्याशी वाद करून त्यांच्यावर मानसिक दडपण निर्माण करीत आहेत. त्या सध्या अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आहे. त्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. शिवाय त्याच्यांवर तक्रार मागे घेण्यासाठी सर्व मार्गांनी दबाव येत आहे, तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बानो आनंद बागडे यांना पोलीस संरक्षण जावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  अन्यथा काही हिंसक, विपरीत प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी शासन, प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, जिल्हा कायदा व्यवस्थापन विभाग प्रमुख ऍड.भरत गुजर, विश्वजीत चौधरी, शहराध्यक्ष अश्फाक पिंजारी आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अर्थसंकल्प फायद्याचा- अशोक जैन

Next Post

घोषणांची अंमलबजावणी व्हावी – डॉ. उल्हास पाटील

Next Post

घोषणांची अंमलबजावणी व्हावी - डॉ. उल्हास पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo