Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण

मुंबई दि. ०८ : मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी डबेवाल्यांना  २,५०० रेशन किटचे वितरण करण्यात आले.

Maha Info Corona Website

मुंबई महानगरपालिकेच्या पी- उत्तर विभागाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रमेश करोंदे, सहाय्यक प्रवक्ता विनोद शेटे , मेक अर्थ ग्रीन अगेन मेगा फाऊंडेशनच्या श्रीमती अनुशा श्रीनिवासन अय्यर व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. शेख म्हणाले, डबेवाले हे मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहेत. डबेवाले १३० वर्षांपासून प्रामाणिकपणे व सचोटीने कार्यालयांमध्ये वेळेवर जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करीत आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत डबेवाल्यांच्या रेशनची व्यवस्था करण्याची व डबेवाल्यांचे सर्व प्रश्न येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची ग्वाही श्री. शेख यांनी यावेळी दिली. तसेच चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुण्यातील डबेवाल्यांच्या घरांचे पंचनामे त्वरित करण्याचे  आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती श्री.अस्लम शेख यांनी दिली.

टाळेबंदीमुळे डबेवाल्यांसमोर उभं राहिलेलं आर्थिक संकट, भविष्यातील या व्यवसायाशी निगडित आव्हाने व प्रश्न आदींविषयी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास  करोंदे यांनी मंत्री श्री. शेख यांच्यासमोर मांडले.  बांधकाम मजुरांना केल्या जाणाऱ्या मदतीच्या धर्तीवर डबेवाल्यांनाही दोन हजार रुपयांची मदत करण्याची व चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्याचे मूळ निवासी असणाऱ्या डबेवाल्यांना त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी संघटनेचे प्रवक्ते श्री. विनोद शेटे यांनी केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात जलसंधारणाची अधिकाधिक कामे राबवा – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Next Post

दर्यापूर तालुक्यात ‘सीसीआय’च्या कापूस खरेदीचा शुभारंभ

Next Post
दर्यापूर तालुक्यात ‘सीसीआय’च्या कापूस खरेदीचा शुभारंभ

दर्यापूर तालुक्यात ‘सीसीआय’च्या कापूस खरेदीचा शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo