Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2022
in राजकारण
Reading Time: 1 min read


सौ.रोहिणीताई खडसे खेवलकर नागरिकांच्या प्रश्नांवर करणार मंथ
न

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी (दि.15) पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसंवाद यात्रेचा शुभारंभ होणार असून त्याद्वारे मतदारसंघातील जनतेचे प्रश्न जाणून घेत त्यावर मंथन करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ॲड. सौ. रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी नियोजन केले आहे.

या निमित्ताने नागरिकांच्या समस्या निवारणासाठी वेगळी यंत्रणादेखील राबविणार असल्याचे ॲड.सौ. रोहिणी खडसे खेवलकर यांनी सांगितले मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील राऊत जिरा या गावाहून दिनांक १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जनसंवाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे. या यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत

या यात्रेबद्दल अधिक माहिती देताना ॲड. रोहिणीताई खडसे खेवलकर म्हणाल्या की, नाथाभाऊंनी मतदारसंघात गेल्या ३५ वर्षापासून काम केले आहे. नाथाभाऊंनी गेल्या दीड वर्षांपूर्वी भाजपाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांच्यासोबत असलेले अनेक वर्षापासूनचे भाजपातील समर्थक व आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरची नवीन टीम अशा कार्यकर्त्यांशी संपर्क, समन्वय साधायचा म्हणून ही जनसंवाद यात्रा सुरू होत आहे.

या दरम्यान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नाथाभाऊंच्या कार्यकाळात मतदारसंघात झालेली कामे आणि काही अपूर्ण प्रकल्प, योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. प्रलंबित कामांच्या संदर्भात नेमक्या काय अडचणी आहेत त्या देखील समजून घेण्यात येणार आहेत. त्या अडचणीत संदर्भात संबंधित विभागाकडे प्रसंगी मंत्रालयस्तरावर त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.

चार महिन्यात १८२ गावांचा संपर्क
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता राऊत झिरा ता.बोडवड या गावापासून जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा १५ ऑगस्ट ते २६ नोव्हेंबर पर्यंत तब्बल चार महिने सुरू राहणार आहे. या १०५ दिवसात सण उत्सवाचे दिवस वगळता ४७ दिवसांचे संपर्क दौऱ्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यात मुक्ताईनगर बोदवड तालुक्यासह रावेर तालुक्यातील २५ अशा सर्व १२२ गावांमध्ये जनसंवाद यात्रा जाणार आहे. यावेळी शक्य असेल त्या ठिकाणी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील हे देखील सहभागी होणार आहेत.

जनसंवाद यात्रेचा उद्देश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वधर्मभाव जपणारा पक्ष असून, जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनापासून बोदवड तालुक्यातील राऊतझिरा येथून राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेला सुरुवात करणार असून २६ नोव्हेंबरला मुक्ताई मंदिर कोथळी येथे यात्रेचा समारोप होईल. ही यात्रा मुक्ताईनगर मतदारसंघातील प्रत्येक गावात जाणार असून गावातील ज्येष्ठ सदस्य बंधू भगिनी ,युवा व युवती कार्यकर्ते, शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित -आदिवासी सर्व घटकातील बांधवांशी यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला जाईल. त्यांच्या सार्वजनिक व वैयक्तिक समस्या जाणून संबंधित समस्या प्रशासनाच्या विभागा कडे सोडवण्यासाठी पाठविल्या जातील. त्याचा पाठपुरावा समिती पक्षामार्फत केला जाईल.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने देशभक्ती व राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण करून “स्वावलंबी गाव ” ही संकल्पना आगामी काळात गावागावात राबविले जाईल. पक्ष संघटन मजबूत करणे त्यासाठी पक्षीय कार्यक्रम आगामी काळात दिले जातील – ॲड.सौ.रोहिणीताई खडसे खेवलकर

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोषणाई ने उजळले महापुरुषांचे पुतळे, सजले चौक आणि उद्याने

Next Post

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम : पिंप्राळा हुडकोत रॅली, जळगावात झेंडे वाटप!

Next Post

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम : पिंप्राळा हुडकोत रॅली, जळगावात झेंडे वाटप!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d