Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘दी धारावी मॉडेल’ पुस्तकाचे प्रकाशन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
14/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘दी धारावी मॉडेल’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई(प्रतिनिधी)- कोरोना रोखण्यात मुंबई महापालिकेने धारावी मॉडेल यशस्वी केले आहे. या यशस्वी प्रयत्नांतील अनुभव, साद्यंत माहितीचा आढावा घेणाऱ्या ‘दी धारावी मॉडेल’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज येथे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.या पुस्तकाचे लेखक किरण दिघावकर हे मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त आहेत.वर्षा निवासस्थानी झालेल्या या प्रकाशन प्रसंगी लेखक श्री. दिघावकर यांच्यासह मुंबई महापालिकेचे आय़ुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.लेखक श्री. दिघावकर यांनी या पुस्तकात धारावीमध्ये कोविड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, प्रयत्नांची मांडणी केली आहे. या उपाययोजनांना जागतिक पातळीवर गौरवले गेले आहे.

केंद्र सरकार, जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटनेकडून आणि विदेशातही धारावी मॉडेलचे कौतुक केले गेले आहे. धारावी मॉडेल म्हणून ही कार्यपद्धती अन्य देशांमधील अशा दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीमध्येही अवलंबण्यात येत आहे.

कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही धारावी मॉडेलने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे.धारावीतील कोविड व्यवस्थापन करताना श्री. दिघावकर यांना आलेले अनुभव आणि आठवणी यांचे हे पुस्तक स्वरुपातील संकलन आहे. इंग्रजीतील हे पुस्तक लवकरच मराठी आणि इतर भाषांमध्ये अनुवादीत स्वरुपात उपलब्ध होणार आहे. पुस्तक ई- बुक स्वरुपात देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना धारावी मॉडेल विस्तृत स्वरूपात जाणून घेणे शक्य होणार आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करता येणार; अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

कोरोना काळात परोपकार व कृतज्ञतेच्या भावनेचे दर्शन -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post
कोरोना काळात परोपकार व कृतज्ञतेच्या भावनेचे दर्शन -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोरोना काळात परोपकार व कृतज्ञतेच्या भावनेचे दर्शन -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo