Thursday, March 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 2 mins read
मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

मदतीत माध्यम प्रतिनिधीही पुढे

मुंबई, दि. २२ : ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा कु.साईशाचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करतांना मुख्यमंत्री सहायता निधीत ११ हजार १११ रुपयांची मदत जमा केली आहे.

Maha Info Corona Website

श्री.परब यांनी मदतीचा हा धनादेश नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.

कोरोना विषाणूविरुद्ध लढतांना राज्यातील व्यापारी, उद्योजक, कॉर्पोरेटर्स, स्वंयसेवी संस्था यांच्याप्रमाणेच अनेक बालयोद्धेही मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीची रक्कम जमा करत आहेत. आज साईशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मदत करणाऱ्या बालयोद्ध्यातआणखी एकाची भर पडली आहे.

साईशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी साईशाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतांना तिला आरोग्यसंपन्‍न दीर्घायु लाभो ही सदिच्छा व्यक्त केली आहे. माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी आज राज्यभरात वृत्तसंकलनाचे काम करत आहेत.  लोकांपर्यंत माहिती पोहोचवत आहेत. हे ही एक प्रकारे कोरोना विषाणूविरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. आतापर्यंत राज्य शासनाला या सर्वांचे खूप चांगले सहकार्य लाभले आहे. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आज वैभव परब यांनी कोरोनाविरुद्ध लढतांना मदतीत माध्यम क्षेत्र ही मागे नाही हे दाखवून दिले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

ज्यांना मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा करावयाची आहे अशांसाठी माहिती-

इंग्रजीत-

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch, 

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.  या खात्यात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाकिस्तानात १०० प्रवाशांसह विमान इमारतींवर कोसळला

Next Post

जनमत प्रतिष्ठन तर्फे अँड.अभिजित रंधे यांचा सन्मान

Next Post

जनमत प्रतिष्ठन तर्फे अँड.अभिजित रंधे यांचा सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d