Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून पाच लाखांची मदत -मंत्री हसन मुश्रीफ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून पाच लाखांची मदत -मंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर(प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दवी असून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हा रुग्णालयास भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.दुर्घटना दिवसा घडली असल्याने त्याबद्दल चौकशीनंतर नेमकेपणाने वस्तुस्थिती समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या दुर्दैवी घटनेत मृत्यु पावलेल्याच्या नातेवाईकांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येत असून चौकशीदरम्यान रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घेणार असल्याने सत्य बाहेर येईल असे पालकमंत्री म्हणाले. या समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई होईल.

दुर्घटनेच्यावेळी रुग्णालयात अनुपस्थित असणाऱ्या संबधितांवरही कारवाई करण्यात येईल. ऱ्हदय पिळवटून टाकणारी अतिशय दुर्देवी घटना असल्याचे ते म्हणाले. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. गेल्या काही काळात स्वत: रुग्णालयाला तीन चार वेळा भेट दिली होती. आरोग्य सेवेसाठी पुरेसे अनुदान शासनाकडून देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. फायर ऑडिटरांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे ते म्हणाले. या घटनेची लवकरात लवकर चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

आगेतील, जखमींवर योग्य उपचार करण्यात येतील आणि त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरिक्षक दीपक पांडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

महाराष्ट्रातील १० मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

Next Post

शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे -मंत्री सुभाष देसाई

Next Post
शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे -मंत्री सुभाष देसाई

शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे -मंत्री सुभाष देसाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo