Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मेहनत व समायोजन यातून दर्जेदार संशोधन शक्य – डॉ एस व्ही जाधव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
मेहनत व समायोजन यातून दर्जेदार संशोधन शक्य – डॉ एस व्ही जाधव

संपूर्ण मानव जाती सहित पर्यावरण व वसुंधराच्या संरक्षणासाठी दर्जेदार संशोधनाच्या माध्यमातून विविध प्रश्नांची उकल करण्याचे महत्कार्य संशोधकांच्या हाती असते . यासाठी समाजातील समस्या ओळखून त्यावर अभ्यासपूर्ण संशोधन केल्यास देश व जगाच्या विकासात मोलाची भर पडेल असे मत डॉ एस व्ही जाधव यांनी व्यक्त केले.

ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी अंतर्गत आयोजित पाच दिवसीय टारगेट पीएचडी एंट्रन्स टेस्ट ऑनलाइन कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलत होते.

यावेळी लेफ्ट डॉ राजेंद्र राजपूत, कार्यशाळेचे सहसमन्वयक प्रा दीपक पाटील व जळगाव , धुळे आणि नंदुरबार येथील सुमारे 42 संशोधक उपस्थित होत.

धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर तर्फे दिनांक 17 जानेवारी पासून 21 जानेवारी 2022 दरम्यान पीएचडी पात्रता प्रवेश परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 साठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या परिपत्रकानुसार सर्व टॉपिक वर सखोल मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.

समारोप प्रसंगी सहभागी संशोधकांनी समाधान व्यक्त करीत व्यवस्थापन, प्रशासन आणि आयोजकांचे आभार व्यक्त केले. यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम हाती घ्यावेत व विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

या पाच दिवसीय विद्या मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी आमदार रावेर – यावल विधानसभा मतदार संघ, सर्व सन्माननीय पदाधिकारी महोदय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सर्व सन्माननीय उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीचे सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आत्मनिर्भर होण्यासाठी प्रशिक्षीत होणे गरजेचे…. प्र-कुलगुरू प्रा.डॉ. बी.व्ही. पवार

Next Post

कवितेचा जन्म वेदनेतून होतो – प्रा. डॉ. सखाराम डाखोरे

Next Post

कवितेचा जन्म वेदनेतून होतो - प्रा. डॉ. सखाराम डाखोरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo