Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

म.अं.नि.स. जळगाव शहर शाखा कार्याध्यक्षपदी जितेंद्र बाबूलाल धनगर व शहर कार्यवाह म्हणून कल्पना शिरीष चौधरी यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
म.अं.नि.स. जळगाव शहर शाखा कार्याध्यक्षपदी जितेंद्र बाबूलाल धनगर व शहर कार्यवाह म्हणून कल्पना शिरीष चौधरी यांची निवड

जळगाव : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शहर शाखेच्या कार्याध्यक्षपदी जितेंद्र बाबूलाल धनगर यांची पुनर्निवड करण्यात आली असून शहर कार्यवाह म्हणून कल्पना शिरीष चौधरी यांची निवड शाखेच्या बैठकीत एकमताने करण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या सुरुवातीला मानसी बागडे आत्महत्याप्रकरणी जातपंचायतीवर गुन्हे दाखल होण्यासाठी 10 दिवसांपासून परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. जातपंचायती मोडून काढण्यासाठी अधिक सक्षमतेने लढण्याचा निर्धार करण्यात आला. जातपंचायतीविरुद्ध लढण्याचे अंनिसचे जिल्ह्यातील हे तिसरे प्रकरण आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राबवायच्या उपक्रमाची प्राथमिक चर्चा करण्यात आली. यानंतर अंनिसच्या स्थापनेपासून गेली 30 वर्षे कार्यकर्ता म्हणून काम करीत असलेले राजेंद्र चौधरी व त्यांच्या  पत्नी सुरेखा चौधरी या दाम्पत्याचा सरकारी सेवेतून  सेवानिवृत्त झाल्याबद्दल शाखेतर्फे प्रभा व भालचंद्र बावस्कर या दाम्पत्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे यांच्या निरीक्षतेखाली शहर शाखा निवड झाली. शहराध्यक्ष म्हणून विकास निकम, उपाध्यक्ष विजय लुल्हे, बुवाबाजी विभाग अशफाक पिंजारी, वैज्ञानिक जाणिवा विभाग दिलीप भारंबे, विविध उपक्रम विभाग प्रभा बावस्कर, कायदा व्यवस्थापन विभाग ऍड.चेतना कलाल यांची निवड झाली. बैठकीला विश्वजीत चौधरी, जितेंद्र धनगर, शिरीष चौधरी, आर.बी.पाटील, प्रा.आर.ए.पाटील, प्रा.आशिष जाधव उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती विद्यामंदिरात बनवली ‘न्यूटन्स डिस्क’

Next Post

रायसोनी महाविध्यालयात येत्या गुरुवारी व शुक्रवारी महारोजगार मेळावा

Next Post
रायसोनी महाविध्यालयात येत्या गुरुवारी व शुक्रवारी महारोजगार मेळावा

रायसोनी महाविध्यालयात येत्या गुरुवारी व शुक्रवारी महारोजगार मेळावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo