Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘या’ ठिकाणी चटके बसल्याने सुरू झाली ‘ही’ सरकारी योजना

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/05/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
‘या’ ठिकाणी चटके बसल्याने सुरू झाली ‘ही’ सरकारी योजना

महाराष्ट्राला १९७२ हे वर्ष मुंबई आणि अनेक कारणांनी लक्षात राहील. पाकिस्तानविरुद्धचं युद्ध भारताने जिंकलं आणि बांगलादेशची निर्मिती केली. त्यामुळे सर्वत्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कौतुक होत होतं; पण त्या आणि पुढच्या वर्षी महाराष्ट्र व अन्य काही राज्यांत प्रचंड दुष्काळ पडला होता.लाखो लोकांनी रोजगाराच्या शोधात मुंबई व अन्य मोठ्या शहरांकडे धाव घेतली होती; पण अन्नधान्याची इतकी टंचाई होती की, शहरांत जगणंही असह्य झालं होतं.

भूकबळी हा शब्द अनेकांनी तेव्हा पहिल्यांदा ऐकला.त्यावर्षी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तरीही काँग्रेसला २७० पैकी २२२ जागा मिळाल्या. इंदिरा गांधी यांनी गोरेगावात सभा घेऊनही समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांनी काँग्रेसचा पराभव केला.

मुंबईत आलेल्या आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर, फूटपाथवर राहणाऱ्यांना ना रोजगार मिळत होता, ना त्यांच्याकडे रेशनकार्ड होतं. राज्य सरकारने त्यांना रेशनकार्ड द्यावं, त्यांना मुंबईतून हाकलू नये, यासाठी सर्वच विरोधक आग्रही व आक्रमक होते. ती मागणीही मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मान्य केली; पण दुष्काळग्रस्तांचे लोंढे कसे थांबवायचे, हा मोठा प्रश्न सरकारपुढे होता.

मंत्र्यांना शहरांत व विशेषतः ग्रामीण भागांत लोक उभं करीत नव्हते. त्यातच शंकरराव मोहिते-पाटील यांनी आपले पुत्र विजयसिंह यांच्या लग्नात लाखभर लोकांना जेऊ घातल्यानं विरोधक व दुष्काळग्रस्त संतप्त होते. विधानपरिषदेचे सभापती वि. स. पागे घरात पत्नीशी गप्पा मारत होते. मध्येच त्यांनी घरात आता किती रुपये आहेत, विचारलं. पत्नीने रक्कम सांगितल्यावर त्या रकमेत किती मजुरांना किती दिवस काम देता येईल, याचं गणितं केलं.लगेच वसंतराव नाईकना फोन केला.

आपण १०० कोटींची तरतूद केली तर दुष्काळग्रस्तांना काम देता येईल, हे सांगितलं. तसा मसुदाच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविला. त्याआधारे वसंतरावांनी मंत्री, अधिकारी यांची बैठक बोलाविली. वि. स. पागे व विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप यांनाही बोलावलं. रस्ते, मृद्संधारण, विहिरी, नालाबंडिंग अशी अनेक कामं काढता येतील, यावर सर्वांचं एकमत झालं. पैसे उभारणीसाठी एसटी तिकिटावर अधिभार लावावा, हेही विरोधी पक्षासह सर्वांनी मान्य केलं.

दरम्यानच्या काळात ग्रामीण भागातील अकुशल लोकांना, शेतकरी व शेतमजुरांना कशा प्रकारे रोजगार देता येईल, याचा सविस्तर अहवाल वि. स. पागे यांनी तयार केला. तो राज्य सरकारने लगेच मान्य केला आणि त्याच वर्षापासून रोजगार हमीची कामं काढायला सुरुवात केली. तेव्हा बहुदा २ रुपये ७० पैसे मजुरी दिली गेली.

दुष्काळ असला, तरी सुरुवातीला पाण्याची टंचाई नव्हती. नंतर गरजेनुसार टँकरची सोय करण्यात आली. काही स्वयंसेवी संस्थांनी रोजगार हमीवर काम करणाऱ्या महिलांच्या लहान मुलांसाठी तिथंच पाळणाघर, शाळा सुरू केल्या. दुष्काळग्रस्त लोकांची उपासमार होऊ नये, म्हणून मफतलाल यांनी गहू, दूध, गूळ यांची सुखडी करून देण्याचं मान्य केलं.

Team Satymev Jayate

Previous Post

‘इतक्या’ कंपन्यांना दिले आधारची पडताळणी करण्याचे अधिकार

Next Post

बार्टीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार

Next Post
बार्टीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार

बार्टीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo