भुसावळ जंक्शन येथून जाणाऱ्या तब्बल २४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्री-नॉन इंटरलॉकिंग / नॉन इंटरलॉकिंग कामामुळे ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सण, उत्सवाच्या काळात रेल्वे विभागाने हा निर्णय घेतल्यानं प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांची संपूर्ण यादी वाचा

१) १८०२९ व ३० शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस,

२) १२८०९ व १० हावडा-मुंबई सीएसएमटी मेल,

३) १२८३३ व ३४ हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस,

४) १२१२९ व १३० हावडा- पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस,

५) १२१०१ व १०२ एलटीटी शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस (१,४ आणि ५ सप्टेंबर),

६) २२८४६ हाटिया पुणे एक्स्प्रेस (2 सप्टेंबर),

७) २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेस (४ सप्टेंबर), १२८१२

८) हटिया-एलटीटी एक्स्प्रेस १२९०६

९) शालिमार- पोरबंदर एक्स्प्रेस (२ आणि ३ सप्टेंबर),

१०)१२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस (४ आणि ५ सप्टेंबर),

११)१२९०५ पोरबंदर- शालिमार एक्स्प्रेस (३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर),

१२) २०८२२ संत्रागाची- पुणे हमसफर एक्स्प्रेस,

१४)२२८९३साईनगर शिर्डी- हावडा एक्स्प्रेस (३ सप्टेंबर),

१५)२०८२१ पुणे- संत्रागाची हमसफर एक्स्प्रेस (५ सप्टेंबर),

१६)२२८९४ हावडा साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (१ सप्टेंबर),

१७) २२९०५ ओखा- शालिमार एक्स्प्रेस (४ सप्टेंबर),

१८)२२९०४ शालिमार ओखा एक्स्प्रेस (६ सप्टेंबर),

१९)१८१०९ व ११० टाटानगर- इतवारी एक्स्प्रेस (३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर)










