Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युथ फॉर हेल्प फाऊंडेशन, एकता ग्रुपने इफ्तार पार्टीतून दिला एकात्मतेचा संदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
युथ फॉर हेल्प फाऊंडेशन, एकता ग्रुपने इफ्तार पार्टीतून दिला एकात्मतेचा संदेश

जळगाव, दि.१८ – राज्यात एकीकडे राजकीय आणि सामाजिक वातावरण सध्या गढूळ झालेले असताना जळगावात मात्र युथ फॉर हेल्प फाऊंडेशन आणि एकता ग्रुपतर्फे रोज इफ्तार पार्टीद्वारे एकात्मतेचा संदेश देण्यात आला. रमजान महिन्यानिमित्त सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात सुरु असलेल्या जातीयवादाकडे लक्ष न देता सर्वांनी आपसात समन्वय ठेऊन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

नेहरू युवा केंद्र जळगाव संलग्नित युथ फॉर हेल्प फाऊंडेशन आणि एकता ग्रुपतर्फे रमजान महिन्यानिमित्त रविवारी शनिपेठेत रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, माजी उपमहापौर करीम सालार, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, डॉ.विवेक जोशी, नदीम मलीक, काँग्रेसचे अमजद पठाण, आदी उपस्थित होते.

राज्यासह जिल्ह्यात सध्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना वाढत आहे. सोशल मीडियात भडकावू आणि अफवा पसरविणारे मेसेज पाठविले जात आहे. भारत हा विविधतेने नटलेला आणि सर्वधर्म समभाव असलेला देश आहे. आपल्या जिल्ह्याची शांतता टिकवून ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. हिंसा करण्याची शिकवण कोणताही धर्म देत नाही. संयम, नियंत्रण ठेवण्याची आपली क्षमता आपल्याला उपवास आणि रोजातून समजते असे मान्यवरांनी सांगितले.

सायंकाळी ६.४५ वाजता रोजा सोडल्यानंतर सर्वांनी अल्पोहार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहेल अमीर शेख, प्रास्ताविक चेतन वाणी तर आभार वसीम खान यांनी मानले. कार्यक्रमासाठी इम्रान खान, अजहर खान, जकी अहमद, जावेद शेख, यासीर खान, फिरोज शेख, शाहरुख खान, तौसिफ़ खान, शाहिद खान, नझर खान, समीर खान, रेहान अली, इरफान सालार, आरिफ शेख, इसरार खान, फहीम खान, सोहेल खान, कमलेश देवरे, कृणाल महाजन आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या सर्वोत्कृष्ट संकल्पनातंर्गत अधिकारी गटात जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचा द्वितीय क्रमांक

Next Post

कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही – कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Next Post
कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही – कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही – कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo