Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवारंग सुकानु समितीची आज आढावा बैठक संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
युवारंग सुकानु समितीची आज आढावा बैठक संपन्न


फैजपूर-(प्रतिनिधी) – धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे आयोजित युवारंग-2022 च्या सर्वांगीण तयारी निमित्त आज सुकाणू समितीची बैठक संपन्न झाली. कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग महोत्सव दि. 9/02/2023 ते 13/05/2023 या पाच दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या भव्य सांस्कृतिक कला, ललित कला व विविध स्पर्धांची जय्यत तयारी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरच्या प्रांगणात होत आहे.

पुढील पाच दिवस या ‘युवारंग’ महोत्सवासाठी विविध प्रकारच्या 32 समित्या कार्यरत असून जळगाव धुळे नंदुरबार तिन्ही जिल्ह्यातून 104 महाविद्यालयांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे त्यात सर्व मिळून 1568 कलावंत 383 सहकलावंत, 176 समूह व्यवस्थापक, उपस्थित असणार एकूण 27 कलाप्रकरांच्या सादरीकरणासाठी 05 रंगमंच उभारण्यात आले आहेत, त्या सर्व रंगमंचाना परिसरातील स्वातंत्र्य सैनिकांची नावे देण्यात आलेले आहेत, प्रतिभागी स्पर्धकांपैकी प्रथम द्वितीय,तृतीय या क्रमांकाचे पारितोषिक सह स्पेसियल चॅम्पियशिप फिरता चषक या सोबतच प्रत्येक जिल्ह्यासाठी उत्तेजनार्थ एक फिरता चषक हे पारितोषिक यावर्षी देण्यात येणार आहे, तसेच पश्चिमात्य व नाट्य संगीत असे दोन नवीन कलाप्रकार यावर्षी समाविष्ट करण्यात आलेले आहेत येणाऱ्या सर्व पाहण्यासाठी पाच दिवस निवासाची,जेवणाची व इतर सर्व साधनसामुग्री ची व्यवस्था अतिशय चोखपणे करण्यासाठी महविद्यालय सज्ज आहे असे मत प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी केले, तसेच विविध स्पर्धांची नियमावली आणि नियोजन या संदर्भात डॉक्टर सुनील कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले, तसेच डॉक्टर विनोद पाटील यांनी युवा रंग युवकांसाठी समाजासाठी व देशाच्या सांस्कृतिक विकासासाठी किती महत्त्वाचा आहे याचे महत्त्व पटवून दिले, विष्णू भंगाळे यांनी युवा रंगाची सुरुवात आणि आतापर्यंतचा प्रवास या संदर्भात सूचना व माहिती दिली, एकूणच सुकाणू समितीच्या सर्व सदस्यांनी युवारंग 2022 कशा पद्धतीने यशस्वी करता येईल या बाबतीत माहिती दिली, व पाहणी करून उर्वरित गोष्टीसाठी उपस्थित सर्व समिती प्रमुख यांना मार्गदर्शन केले व पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर माहिती दिली.

प्रसंगी ‘युवारंग2022’ सुकाणू समितीचे सदस्य डॉ.विनोद पाटील-कुलसचिव कावियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, प्राचार्य. डॉ.पी.आर.चौधरी, श्री.राजेंद्र नन्नवरे – कार्याध्यक्ष ‘युवारंग2022’ व रज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य, सदस्य, श्री.एस.आर.गोहिल-वित्त व लेखा अधिकारी, डॉ.सुनील कुलकर्णी-विद्यार्थी कल्याण अधिकारी, नवनियुक्त अधिसभा सदस्य श्री.विष्णूभाऊ भंगाळे,डॉ.सुनिता पालवे डॉ.शिवाजी पाटील, स्वप्नाली महाजन, नेहा जोशी तसेच डॉ.एस.व्ही.जाधव- समन्वयक यवरंग 2022, डॉ.राकेश तळेले- सहसमन्वयक, उप प्राचार्य.डॉ.उदय जगताप, उपप्राचार्य डॉ.एन.ए.भंगाळे, उपप्राचार्य. प्रा.विलास बोरोले, प्रसिद्धी समिती प्रमुख डॉ.विजय सोनजे, प्रा.उमाकांत पाटील व विद्यार्थी विकास विभाग कबचौउमवि जळगाव चे कर्मचारी श्री जगदीश शिवदे,श्री. मच्छिंद्र पाटील तसेच परिसरातील सर्व नामवंत वर्तमानपत्राचे संपादक व वार्ताहार मान्यवर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खंडणीप्रकरणी सरपंचाची दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अपीलात जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये रद्द

Next Post

शास्त्रीयदृष्ट्या शेती शेतकऱ्यांच्या फायद्याची – डॉ. के. ई. लवांडे

Next Post
शास्त्रीयदृष्ट्या शेती शेतकऱ्यांच्या फायद्याची – डॉ. के. ई. लवांडे

शास्त्रीयदृष्ट्या शेती शेतकऱ्यांच्या फायद्याची - डॉ. के. ई. लवांडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo