Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राजधानी एक्सप्रेस चे स्वागत खा. उन्मेश पाटील व खा.रक्षाताई खडसे यांनी दिला राजधानी एक्सप्रेसला हिरवी झेंडा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2019
in राजकारण, राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read
राजधानी एक्सप्रेस चे स्वागत खा. उन्मेश पाटील व खा.रक्षाताई खडसे यांनी दिला राजधानी एक्सप्रेसला हिरवी झेंडा

जळगाव(प्रतिनिधी)- जळगाव भुसावळ व एकूणच मतदार संघातून  दिल्ली कडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मतदार संघातील प्रवाशी नागरिकांना कमी वेळेत दिल्ली येथून ये जा करणे शक्य व्हावे. यासाठी सप्ताहातून दोन दिवस थांबणारी राजधानी एक्स्प्रेस दररोज थांबावी यासाठी खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे मतदारसंघातून मागणी वाढतच होती. ही बाब खासदार उन्मेश पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचेकडे मांडली होती. त्यांची मंत्री महोदयांनी लागलीच दखल घेत दोन दिवस थांबणारी राजधानी एक्सप्रेस आता दोन दिवस वाढवून मिळाल्याने चार दिवस थांबणार आहे. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय काही प्रमाणात थांबणार आहे. रेल्वे मंत्रालयाशी सतत संपर्क करीत राजधानी एक्सप्रेसचे थांबे वाढवून मिळाल्याने आज या गाडीला दुपारी साडे चार वाजता खासदार उन्मेष दादा पाटील, खासदार रक्षा ताई खडसे यांनी आज हिरवी झेंडी दाखविली याप्रसंगी भुसावळ डी आर एम विवेक गुप्ता, आमदार चंदुलाल पटेल, नामदार उज्वलाताई पाटील, महापौर नामदार सीमाताई भोळे, जिल्हा परिषदेचे सभापती पोपट भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, जिल्हा सरचिटणीस तथा  माजी नगरसेवक दीपक सूर्यवंशी, पालकमंत्र्यांचे जिल्हा सचिव अरविंद देशमुख, सिनियर मंडल प्रबंधक स्वप्नील निला,सिनियर डी सी एम आर के शर्मा, सिनियर डी सी टी ई निशांत द्विवेदी, सिनियर डी ई एन दीपक कुमार, जळगाव स्टेशन प्रबंधक अरुण पाण्डेय,नगरसेवक नवनाथ दारकुंडे,  किशोर बाविस्कर, नगरसेविका सरिता नेरकर, मिलिंद चौधरी आसोदा, तालुकाध्यक्ष संजय भोळे ,विशाल त्रिपाठी अजय जोशी, मनोज भांडारकर, पालक मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद भाऊ देशमुख, पितांबर जी भावसार, होणाजी चव्हाण, महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य  समन्वयक सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील कुँझरकर, राहुल तिवारी, गिरीश ब-हाटे, अर्जुन परदेशी, यांच्यासह मंडळ, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख , आजी माजी नगरसेवक विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना उन्मेष पाटील यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मतदार संघातील नागरिकांच्या वतीने आभार मानले . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ही आधी  द्वीसप्ताह गाडीला चार  दिवस प्रती सप्ताह थांबा वाढवून मिळाल्याने या गाडीचे स्वागत तसेच जळगाव स्थानकावरील  एक्सेलेटर्स अर्थात सरकत्या जिन्यांचे मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून उद्घाटन करण्यात आले .यावेळी सरकत्या जिन्यावरून प्रत्यक्ष खासदार व मान्यवरांनी आलिया उद्घाटन केले असता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत ,अनेकांनी आनंदघेतला. व परस्परांना पेढे भरून जल्लोष केला. याप्रसंगी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. “एक कदम स्वच्छता की और” चे फलक घेऊन खासदार उन्मेष पाटील यांच्यासह उपस्थितांनी हातात झाडू घेत रेल्वे स्टेशन वर स्वच्छता केली. यावेळेस स्वच्छता पंधरवड्याच्या संदर्भात राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक  किशोर पाटील कुंझरकर यांनी कृतीयुक्त माहिती दिली, दोन्ही खासदारांसह उपस्थित सर्व मान्यवर वसर्वांनी रेल्वे स्थानकावरप्रत्यक्ष स्वच्छता करून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी यांच्या स्वच्छता हीच सेवा अभियानाला कृतीयुक्त साथ दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयात हिंदी दिन उत्साहात

Next Post

आशयायी योगासन चॅम्पियनशिप ला योग पंच म्हणून गेलेल्या डॉ. अनिता पाटील यांचेशी केलेला संवाद

Next Post

आशयायी योगासन चॅम्पियनशिप ला योग पंच म्हणून गेलेल्या डॉ. अनिता पाटील यांचेशी केलेला संवाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo