Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राजपूतसह इतर समाजबांधवांच्याही उन्नतीसाठी एकजुटीने काम करा ;श्री राजपूत करणी सेनेच्या खान्देशस्तरिय मेळाव्यात उमटला सूर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
राजपूतसह इतर समाजबांधवांच्याही उन्नतीसाठी एकजुटीने काम करा ;श्री राजपूत करणी सेनेच्या खान्देशस्तरिय मेळाव्यात उमटला सूर

जळगाव- श्री राजपूत करणी सेनेतर्फे राजपूत समाजबांधवांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. या संघटनेतर्फे राजपूतसह इतर सर्वसमावेशक समाजबांधवांना सुध्दा सोबत घेवून सर्व घटकातील बांधवांचा विकास साधावा. गरजूंपर्यंत योग्य ती मदत पोहचवावी, असा सूर श्री राजपूत करणी सेनेच्या विभागीय मेळाव्यात उमटला. हा मेळावा रविवारी वाघूर धरणाजवळील परेश रिसोर्ट येथे झाला.
व्यासपीठावर स्वामी रवींद्रसिंग महाराज, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्रसिंग चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष नंदा राजपूत, खान्देश विभागीय अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील, विलाससिंग पाटील, विठ्ठलसिंग मोरे, गणेशसिंग राजपूत, मुंबई शहर उपाध्यक्ष दिलीपसिंग राजपूत, युवक जिल्हाध्यक्ष रंजनसिंग पाटील, जिल्हा संघटक गणेशसिंग राणा, जिल्हा उपाध्यक्ष बी.एच.खंडाळकर आदी उपस्थित होते.
समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा, सामूहिक विवाह सोहळा घेण्यात यावा. अनिष्ठ रुढी, परंपरांना फाटा देवून सुधारणावादी विचार अमलात आणावा. जातपडताळणी प्रमाणपत्राच्या कामात अनेक अडचणी येतात. त्या अडचणी सोडवणे व आरक्षणाविषयी आवाज उठवण्यात यावा. मुलींच्या शिक्षणावर व महिला सबलीकरणावर देखील भर देण्यात यावा, असे मत मनीषा पाटील, उज्ज्वला पाटील, आशा राजपूत, नंदा राजपूत यांनी व्यक्त केले.


एकजुटीने संघटन वाढवा


सर्व समाजबांधवांनी काही मतभेद, गट, तट असल्यास ते बाजूला ठेवून एकजुटीने सामाजिक कार्य करावे. मुला-मुलींच्या उच्च शिक्षणावर भर द्यावा, तरुणाईला व्यसनांपासून रोखण्यासाठी जनजाग्रुती करण्यात यावी. समाजातील शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करा, असे मत दिलीपसिंग पाटील, सूरजसिंग राजपूत, काशिनाथसिंग ठाकूर, तुकारामसिंग पाटील, श्यामसिंग राणा यांनी व्यक्त केले.


इतरांनाही समजून घ्या


राजपूत समाजातील इतर पोटजातींमधील समाजबांधवांना देखील समजून घ्या. केवळ शेती, नोकरीवरच अवलंबून न राहता इतर उद्योग, व्यवसाय सुद्धा करा.शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींकरिता वसतीग्रुहाची सोय करण्यात यावी, असे मत स्वामी रवींद्रसिंग महाराज यांनी व्यक्त केले.


मदतीचे आश्वासन


राजपूत समाजासोबत काम करणाऱ्या इतर समाजबांधवांना देखील संघटनेत सामावून घेण्यात यावे. गरजूंना योग्य ती मदत देण्याचे अाश्वासन प्रवीणसिंग पाटील यांनी दिले. तसेच त्यांनी वु्द्धाश्रम उभारण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही देखील दिली. तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे लक्ष देवून यशस्वी व्हावे. आपल्यातील आक्रमकता चांगल्या कामासाठी वापरा. मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता दोघांना समान संधी उपलब्ध करुन द्या. नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा, असे मत गणेशसिंह राजपूत, सुरेशसिंग राजपूत यांनी व्यक्त केले. जळगावात राष्ट्रीय मेळावा होणे अपेक्षित आहे. समाजकार्य करताना समर्पणाची भावना ठेवण्याचे आवाहन वीरेंद्रसिंग चव्हाण यांनी केले.


कोरोना यौद्ध्यांचा गौरव


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा, जनजाग्रुती, इतर समाजसेवा करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक विलाससिंग पाटील, सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले.
या मेळाव्याप्रसंगी जळगाव शहराध्यक्ष अतुलसिंग पाटील, संजयसिंग राजपूत, संजीवनी इंगळे यांच्यासह धुळे, नंदुरबार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील आणि मध्य प्रदेशातील पदाधिकारी देखील आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विद्यार्थ्यांकडून ऑटोनोम्स झाल्यामुळे सक्तीची फी वसुली करू नये, प्रत्येकाची परिस्थिती सारखी नाही -अँड. अभिजित रंधे

Next Post

खडके बु येथील दि,२९डिसेंबर चा प्रसिद्ध यात्रोत्सव रद्द।

Next Post

खडके बु येथील दि,२९डिसेंबर चा प्रसिद्ध यात्रोत्सव रद्द।

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d