Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राजर्षी  शाहू महाराज स्मृतीदिनी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे विशेष व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
राजर्षी  शाहू महाराज स्मृतीदिनी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे विशेष व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन

मा.श्री. अमित विलासराव देशमुख, मंत्री, सांस्कृतिक कार्य यांची माहीती
  
जळगाव – (प्रतिनिधी) – दि 06 मे, 2022 जळगाव :- आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामध्‍ये एकाच दिवसी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीदिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिक प्रशासकीय विभागातील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगाव या ठिकाणी दि. 06 मे,  2022 रोजी  सकाळी 11.00  वाजता राजर्षी  शाहू महाराज स्मृतीदिनी प्रा. गणपत धुमाळेयांचे विशेष व्याख्यान आयोजित केलेले आहे. या व्याख्यानात समता मूलक समाज निर्मितीत राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान या विषयावर आपले विचार मांडतील, तर शाहीर शिवाजी पाटील व सहकलाकार यांचे राजर्षी  शाहू महाराज  यांच्या जिवन कार्यावर, विविध सामाजिक विचारावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक व शैक्षणिक, राजकीय विचारधारा, समता मूलक समाज निर्मितीमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान, राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक पैलू अशा आशयाच्या विविध विषयांवर व राजर्षी शाहू महाराज यांच्या वैचारिक पैलूंवर विशेष व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम राज्यातील सर्व प्रशाकीय विभागात आयोजित करण्यात आलेला आहे. 
 
     जळगाव येथे  होऊ घातलेल्या राजर्षी  शाहू महाराज स्मृतिदिनी  विशेष  व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी कलाकाराचा किंबहुना राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या विचारवंताचे विशेष व्याख्यान तसेच शाहिरी पोवाडा, गीतगायन अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी   आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री.विभिषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय  यांनी केले आहे.
 
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

साहस वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ संपन्न

Next Post

अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
रमाई घरकूल योजनेसाठी तालुका निहाय प्रस्तावांना मंजुरी;समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo