Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यस्तरीय स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव टीमचे पटकावले ३१ पदक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यस्तरीय स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव टीमचे पटकावले ३१ पदक
ए

जळगाव, दि.२१ – सोलापूर येथे नुकतेच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय 8 व्या स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमने चांगले प्रदर्शन करत घवघवीत यश मिळवले आहे. जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्याने सोलापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत नेतृत्व केले.

स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमतर्फे कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, धावणे, आर्चरी, स्विमिंग, बॅडमिंटन,चेस व गोळा फेक या स्पर्धेत जिल्हाभरातून 98 खेळाडू सहभागी झाले होते. त्यात व्हॉलीबॉल टीम (चोपडा) ला सिल्व्हर मेडल, स्विमींग मध्ये ऋषिकेश पाटील (चोपडा) गोल्ड मेडल, चेस स्पर्धेत मध्ये राहुल लोहार यांना गोल्ड मेडल (चोपडा), तुषार पाटील यांना सिल्व्हर मेडल (धरणगाव), गौरव पाटील गोल्ड मेडल (अमळनेर), बॅडमिंटन स्पर्धेत वरून महाजन यांना गोल्ड मेडल (अमळनेर). कुस्ती स्पर्धेत पै.प्रतीक पाटील यांना सिल्व्हर मेडल ( अमळनेर), पै.महेश वाघ यांना 57 किलो गटात गोल्ड मेडल (धरणगाव), पै.अमोल महाजन यांना 60 किलो गटात गोल्ड मेडल ( धरणगाव), पै.भावेश कोळी यांना 51 किलो गटात सिल्व्हर आणि 55 किलो गटात गोल्ड मेडल(धरणगाव), पै.राजेंद्र माळी 51 किलो गटात ब्राँझ मेडल (धरणगाव). आर्चरी स्पर्धेत अंडर 17 गटात घनश्याम मराठे यांना गोल्ड मेडल (चोपडा), कमिश बारेला यांना सिल्व्हर मेडल (चोपडा), दीपक पाटील यांना ब्राँझ मेडल (चोपडा) तसेच अंडर 19 गटात शिवाजी वाघ यांना गोल्ड मेडल (चोपडा), जयेश पाटील यांना सिल्व्हर मेडल (चोपडा), चेतन पाटील यांना ब्राँझ मेडल (चोपडा), अंडर 25 गटात चेतन पाटील यांना गोल्ड मेडल (चोपडा). ॲथलेटीक्स स्पर्धेत जळगाव जिल्हा संघातील चौगाव ता.चोपडा येथील विशाल पारधी (5 किमी.धावणे, गोल्ड मेडल), शुभम पाटील (100 मी. धावणे, सिल्व्हर व 200 मी. धावणे, ब्राँझ मेडल), वासुदेव कोळी (10 किमी.धावणे, ब्राँझ मेडल) उमेश धनगर (3000मी. धावणे, सिल्व्हर मेडल), मारवड ता.अमळनेर येथील कुंदन शिरसाठ (ब्राँझ मेडल) मिळाले असे जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील यांनी दिली. जळगाव जिल्हा स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशनचे कोच पवन पाटील सर (चोपडा), पै.संदीप कंखरे सर (धरणगाव) यांचे मार्गदर्शन लाभले.स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जळगाव जिल्हा टीमच्या या यशाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सदाबहार गीते सादर करत “गीतगंगा २०२१’ ने विद्यार्थी मंत्रमुग्ध

Next Post

दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर

Next Post
दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर

दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo