Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य जीएसटी जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून धडक कारवाई ,६५ कोटी रुपयांच्या बोगस बिलासंदर्भात एकास अटक

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/08/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
राज्य जीएसटी जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून धडक कारवाई ,६५ कोटी रुपयांच्या बोगस बिलासंदर्भात एकास अटक

जळगाव दि. 1 ( जिमाका ) खोटी बिले देऊन अथवा घेवून शासनाची करोडो रूपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्याविरूध्द महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी या प्रकरणांमध्ये अन्वेषण भेट देण्यात आली होती. तपासणी दरम्यान असे लक्षात आले की, करदाते मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी चे मालक श्री. नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केला.

मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी या प्रकरणामध्ये मालक श्री. नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता तब्बल ६५ कोटीची खोटी बिले देऊन शासनाची १२.६५ कोटी रुपयांची कर महसूल हानी केल्याचे उघडकिस आले आहे. या करदात्याने महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे श्री. नामदेव दौलत धनगर यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत कर चुकवेगिरीसाठी दि.०१/०८/२०२४ रोजी करण्यात आलेल्या कार्यवाही दरम्यान अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जळगाव यांच्या न्यायालयाने १४ दिवसापर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर अटक कार्यवाही ही श्री. सुभाष परशुराम भवर, राज्यकर सहआयुक्त, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सूर्यकांत युवराज कुमावत, (राज्यकर उपायुक्त) अन्वेषण शाखा, जळगाव, यांच्या नेतृत्वात श्री. माहुल संजयकुमार इंदाणी, (सहायक राज्यकर आयुक्त), अन्वेषण शाखा, जळगाव, श्री. रामलाल सोगालाल पाटील, (सहायक राज्यकर आयुक्त), अन्वेषण शाखा, जळगाव यांचे मार्फत अंमलात आली सदर पथकात राज्यकर निरीक्षक श्री. प्रशांत शिवाजी रौंदळ, श्री. संदीप मखमल पाटील, श्री. योगेश सुभाषराव कानडे, श्री. स्वप्नील लोटन पाटील, श्री. दीपक गोकुळ पाटील, श्री. सिद्दार्थ शंकर मोरे, श्रीमती. संध्या नंदकिशोर वाकडे, श्रीमती. श्वेता अरुण बागुल व कर सहायक श्री. परमेश्वर विश्वासराव इंगळे यांचा समावेश होता.

सदर अटक कार्यवाही श्री. सुभाष ऊमाजी एंगडे (अपर राज्यकर आयुक्त), नाशिक क्षेत्र, नाशिक यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.
या प्रकरणामध्ये पुढील तपास सुरू असून प्रकरणांतील इतर संबंधितांवरही लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची ह्या आर्थिक वर्षातील ही ७ वी अटक असून विभागाने खोटया कर वजावटीचा दावा करणाऱ्या व खोटी बिले देऊन कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांना या कार्यवाहीतून गंभीर इशारा दिल्याचे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

Next Post

एक फोन.. साहेब, आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका.. अधिकाऱ्यांनी लागलीच केली रस्त्याची डागडुजी

Next Post
एक फोन.. साहेब, आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका.. अधिकाऱ्यांनी लागलीच केली रस्त्याची डागडुजी

एक फोन.. साहेब, आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका.. अधिकाऱ्यांनी लागलीच केली रस्त्याची डागडुजी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo