Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शुटिंग, सायकलिंग व ॲथलॅटिक्स या खेळाच्या प्रवेशाकरिता निवड चाचणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) :-   आंतराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने ( खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्रांअतर्गत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळंगे- बालेवाडी, पुणे येथे शुर्टींग, सायकलिंग व ॲथलॅटिक्स या तीन  खेळाकरिता राज्य निपुणता केंद्र कार्यन्वित करण्यात आलेले आहे. राज्य निपुणता केद्राअतर्गत शुर्टिग – 24, सायकलिंग – 14 व ॲथलॅटिक्स-18 या संख्येनुसार  खेळाडुंची निवड करण्यात येणार आहे. सदर खेळांच्या निवड चाचणीसाठी शुर्टिंग, सायकलिंग व ॲथलॅटिक्स या खेळातील राज्यस्तरावर प्राविण्यप्राप्त किंवा राष्ट्रीयस्तरावर सहभाग / प्राविण्य प्राप्त खेळाडु पात्र असतील, सदर निवड चाचण्या दिनांक 30 ते 31 मे, 2022 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे  येथे घेण्यात येणार आहे.

          सदर निवड चाचण्याकरिता खेळाडुंनी जातांना राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रमाणपत्रांची व शैक्षणिक कागदपत्रांची छायांकीत प्रतसह मुळ प्रत तसेच जन्म तारखेची नोंद असलेल्या जनरल रजिष्टरची छायांकित प्रत सोबत घेवुन जाणे आवश्यक आहे. सदर चाचण्याचे विहित नमुन्यतील अर्ज  [email protected]  या ई-मेल वर दिनांक 23 मे, 2022  पर्यंत पाठवावे. सदर निवड चाचण्यासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुगे- बालेवाडी, पुणे येथे आवश्यकतेनुसार फक्त खेळाडुंची निवासाची व्यवस्था करण्यात येणार असुन, प्रवास व भोजन खर्च स्वखर्चाने करावयाचा आहे.

          तरी जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा / संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शाळा, विविध क्रीडा संघटना व क्रीडा मंडळे यांनी राज्यस्तरावर शुटिंग, सायकलिंग व ॲथलॅटिक्स या खेळाच्या निवड चाचण्यांकरिता इच्छुक सहभागी मुलांमुली खेळाडुंना विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी श्री. मिनल थोरात राज्य क्रीडा मार्गदर्शक 8625946709 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

खावटीची रक्कम वसुल करण्यासाठी 6 जून, 2022 रोजी तहसिल कार्यालय जामनेर येथे जप्त केलेल्या शेतजमीनीचा जाहिर लिलिवाव्दारे विक्री

Next Post

व्हॉलीबॉल खेळाच्या कौशल्य वृध्दी व गुणवंत खेळाडु (मुली) शोध घेणे व त्यांना मर्यादित कालावधीतच अत्युच्च प्रशिक्षण देणे

Next Post

व्हॉलीबॉल खेळाच्या कौशल्य वृध्दी व गुणवंत खेळाडु (मुली) शोध घेणे व त्यांना मर्यादित कालावधीतच अत्युच्च प्रशिक्षण देणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d