Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे जागतिक महिला दिनी उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

मुंबई, दि. 4 : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला दिनी दि. 8 मार्च, 2021 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास, कोकण विभागाच्या विभागीय उप-आयुक्तांनी दिली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती अनिता पाटी (भा.व.से) यांचे हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.

महिला व बालविकास विभागाने राज्यातील महसूली विभागस्तरावर राज्य महिला आयोगाची कार्यालये स्थापन करण्यासंदर्भात दि. 10 फेब्रुवारी, 2021 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार हे कोकण विभागीय कार्यालय विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, कोकण विभाग, सदनिका नं.05/06, शांती बिल्डींग, बी- विंग, विश्वधन को-ऑप. हौ. सोसा. लिमिटेड, सर्वोदय पार्श्वनाथनगर, जैन मंदीर रोड, मुलूंड (पश्चिम), मुंबई-400080, दूरध्वनी क्र.022-25917655, ईमेल आय.डी. [email protected] येथे सुरु करण्यात येत आहे.

या कार्यालयाच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर व सिंधुदुर्ग या कोकण विभागातील सातही जिल्ह्यांमध्ये महिलांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण होण्याच्या दृष्टीने काम केले जाईल. त्यानुसार महिलांना त्यांच्या इच्छेनुसार तज्ज्ञ समुपदेशकांमार्फत समुपदेशन केले जाईल किंवा स्थानिक पोलीस स्टेशनकडून सहकार्य घेण्यात येईल. अतिमहत्त्वाच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी किंवा स्वाधिकारे (Suo moto) नोंद घ्यावयाच्या तक्रारींबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येईल. आयोगाच्या विभागीय कार्यालयाद्वारे प्रस्तावित/नियोजित सुनावण्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील.

तरी कोकण विभागातील विविध प्रकारच्या अत्याचाराने पीडित असलेल्या महिलांनी व अशा महिलांना मदत करु इच्छिणाऱ्यांनी वरील ठिकाणी दूरध्वनीद्वारे अथवा [email protected] या ईमेल आयडीवर अथवा शक्य असल्यास प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहनही कोकण विभागाचे विभागीय उप-आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

८ मार्च रोजी विद्यार्थी विकास विभाग व IQAC द्वारे राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन; लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय

Next Post

खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेती धोरणाबाबत बैठक संपन्न

Next Post
खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेती धोरणाबाबत बैठक संपन्न

खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेती धोरणाबाबत बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo