Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य शासन अनाथ बालकांचा आधारवड; “मिशन वात्सल्य” अंतर्गत अनाथ मुले व विधवांना मिळणार लाभ -पालकमंत्री गुलाबराव पाटील

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
राज्य शासन अनाथ बालकांचा आधारवड; “मिशन वात्सल्य” अंतर्गत अनाथ मुले व विधवांना मिळणार लाभ -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या आणि विधवा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. या बालकांच्या मागे राज्य शासन ‘आधारवड’ म्हणून खंबीरपणे उभे राहील. ‘मिशन वात्सल्य अंतर्गत’ अनाथ मुले व विधवांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते अजिंठा शासकीय विश्रामगृहात आज सकाळी कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या जिल्ह्यातील २० बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मुदतठेवीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत, ॲड. प्रदीप पाटील, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक विशाल भालेराव, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, परीविक्षाधिन अधिकारी संजय पाटील, बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार आदी उपस्थित होते.

याचबरोबर जिल्ह्यातील दोन्ही पालक गमावलेल्या २० व एक पालक गमावलेल्या ६४९ बालकांना बाल संगोपन योजनेतंर्गत दरमहा ११०० रुपये मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, अनाथ मुलांचे पालक म्हणून राज्य शासनाने जबाबदारी घेतली आहे. या मुलांना शासकीय नोकरीत एक टक्के आरक्षण राहील. ते सज्ञान झाल्यावर मुदतठेवीची रक्कम त्यांना प्राप्त होईल.

या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील. तसेच कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यातील ३३७ महिलांना वैधव्य आले आहे. या माता- भगिनींना दिलासा म्हणून ‘मिशन वात्सल्य’ योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांचा लाभ देण्यात येईल. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री. परदेशी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. श्री. मुक्कावार यांनी आभार मानले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

व्यापारी बांधवांमध्ये उत्साह! २९ वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे; आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतंर्गत 14 महिलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

Next Post
राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतंर्गत 14 महिलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतंर्गत 14 महिलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d