Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

व्यापारी बांधवांमध्ये उत्साह! २९ वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे; आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
व्यापारी बांधवांमध्ये उत्साह! २९ वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे; आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

पाचोरा(प्रतिनिधी)- येथे कै. के.एम.(बापु) पाटील व्यापारी संकुल उभारले आहे. मात्र यातील अटी शर्ती बाबत आक्षेप घेत सदरील गाळे दुर्घमुदतीने देण्याची मागणी काही व्यापारी बांधवानी केली होती.

सदर गाळ्यांचे भाडे कमी करणे व सदरील गाळे दिर्घमुदतीने अर्थात २९ वर्षे कराराने देणे बाबत पालिका प्रशासनास विनंती केली होती. दरम्यान व्यापारी बांधवांच्या मागणीची दखल घेत आ.किशोर पाटील यांच्या विनंतीवरून ना.एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते.

दरम्यान मंत्री एकनाथ शिंदेनी गाळे दिर्घमुदतीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे. नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र जावक क्रमांक एम यु एम २०२१/ प्र क्र २७२/नवी १७ दि.३० सप्टेंबर २०२१ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन स्वयंस्पष्ट अहवाल शासनास तात्काळ सादर करण्यासचे आदेश दिले आहेत व त्यानुसार पाचोरा पालिकेने तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश येणार असून व्यापारी बांधवांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.

दरम्यान या बैठकीला आ.किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल हे प्रत्यक्ष उपस्थीत होते. तसेच नगरपालिका प्रशासनातर्फे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी डी.एस. मराठे हे ऑनलाईन उपस्थित होते. ना. शिंदे यांनी सदर नवीन गाळ्याचे भाडे कमी करणे व गाळे दीर्घ मुदतीने भोगवटा ने देण्याकरीता सकारात्मक चर्चा झाली. सदर गाळे दीर्घ मुदतीने देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर पालिका प्रशासनास दिले आहे. यावेळी नगरविकास विभाग प्रधान सचिव भूषण गगराणी, विशेष कार्यकारी अधिकारी कृष्णा जाधव व डॉ. राजेश कावडे उपस्थित होते.

दरम्यान आ.किशोर पाटील यांनी ना.शिंदे यांच्याकडे राज्यातील १९९३ पूर्वी सेवेत रोजंदारी कर्मचारी म्हणून दाखल झालेल्या सफाई कर्मचारी यांना वारसा हक्क देण्याबाबत मागणी केली होती या मागणीला देखील ना. शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यामुळे पाचोरा नगरपालिकेच्या ६० कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील सफाई कामगार बांधवाना याचा लाभ मिळणार आहे.

शासनाच्या या होऊ घातलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा लाभ राज्यभरातील पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे धारक व्यापारी बांधवांना व सफाई कामगार बांधवांना होणार असून ही त्यांना शासनाकडून ही जणू दिवाळी भेट मिळणार आहे.

आमदार किशोर पाटील(पाचोरा- भडगाव)

Team Satymev Jayate

Previous Post

सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी 13 ऑक्टोबर रोजी परीक्षा

Next Post

राज्य शासन अनाथ बालकांचा आधारवड; “मिशन वात्सल्य” अंतर्गत अनाथ मुले व विधवांना मिळणार लाभ -पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post
राज्य शासन अनाथ बालकांचा आधारवड; “मिशन वात्सल्य” अंतर्गत अनाथ मुले व विधवांना मिळणार लाभ -पालकमंत्री गुलाबराव पाटील

राज्य शासन अनाथ बालकांचा आधारवड; "मिशन वात्सल्य" अंतर्गत अनाथ मुले व विधवांना मिळणार लाभ -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo