Sunday, November 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचा विद्यार्थी झळकला “दूरचित्रवाणीवर”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचा विद्यार्थी झळकला “दूरचित्रवाणीवर”

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वात महाविद्यालयाच्या “म्युझीक क्लबचा” मोठा हातभार

जळगाव, ता. १७ : प्रतिभेला मार्गदर्शन आणि संधीची साथ लाभली व  प्रामाणिकपणे मेहनत केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसते या वाक्याला तंतोतंत साजेसे असे काम रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचा विध्यार्थी प्रवीण लाड याने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील वढनेर भोलजी ता. नांदुरा या  छोटयाशा गावात जन्मलेला युवाकलावंत प्रवीणचे नुकतेच “तुझे पैंजण” या शीर्षकाखाली तेरावे अल्बम प्रसिद्ध झाले आहे.

हा गीत अल्बम मोठ्याप्रमाणात लोकप्रिय होत असून दूरचित्रवाणीवरील ९ एक्स झक्कास, संगीत मराठी, मायबोली अशा विविध वाहिनीवर “तुझे पैंजण” या गाण्याचाच बोलबाला सुरु आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रवीणला लहानपणापासूनच कलेची आवड होती. रायसोनी महाविद्यालय विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांना वाव मिळण्यासाठी म्युझिक क्लब, ड्रामा क्लब, डान्स क्लब अशा विविध क्लबच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत असते आणि याच क्लबचा विध्यार्थी असणाऱ्या प्रवीण लाडने कला क्षेत्रात आपले व आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.   गेल्या ३ वर्षापासून प्रविण लाड हा मनोरंजन क्षेत्रात मेहनत करताना त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यांमधून , नाटकांमधून आणि लघुपटातून पाहायला मिळत आहे . ” अरविंद इंटरटेनमेंट ” प्रस्तुत ‘तुझे पैंजण ‘ ज्यांचे असोसिएट पार्टनर बंधन प्रॉडक्शन्स, मायरा प्रॉडक्शन्स आणि भाग्यदीप मुसिक असून हे गाणे गेल्या ८ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण बंधन प्रोडक्शन  यांनी केलेले आहे. ड्रोन पायलट घनश्याम यांनी ही छान चित्रीकरण केले. सोबतच  केसावर फुगे फेम अण्णा सुरवाडे  यांचे गीत व गायन असून पहिल्यांदाच ते रोमॅण्टिक गाण्यांमधून आपली छाप संपूर्ण महाराष्ट्र मध्ये टाकत आहेत,  दिग्दर्शकाने आणि कथा लेखकाने गाण्यांमधून एक समाज प्रबोधन करत एका विधवा महिलेचे आयुष्य समाज कश्याप्रकारे बदलऊ शकतो सोबतच त्यांच्याकडे पाहण्याची नजर ही काळानुसार बदलायला हवी असे दाखावण्याचा खूप छान प्रयत्न या गाण्यातून केला आहे. सदर गाण्याचे चित्रीकरण हे खान्देश मधील रायपुर, पाल आणि पद्मालय येथे  झालं असून  तीन दिवसाच्या या चित्रीकरणात त्यांनी अप्रतिम दृश्य आणि छान  गोष्ट या गाण्यातून दाखावण्याच्या प्रयत्न केला आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

Next Post

सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचा संकल्प करावा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post
सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचा संकल्प करावा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचा संकल्प करावा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo