Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहा’निमित्त उद्या माहिती विभागाच्यावतीने प्रशिक्षणसत्राचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
‘राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहा’निमित्त उद्या माहिती विभागाच्यावतीने प्रशिक्षणसत्राचे आयोजन

मुंबई(प्रतिनिधी)- राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरुकता सप्ताहानिमित्त मुंबईस्थित ‘आय केअर’ या स्वयंसेवी संस्था आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अकस्मात हृदयरोग जागरुकता यासंदर्भात 25 सप्टेंबर (शनिवार) रोजी सकाळी 10.30 वा. दूरदृश्य माध्यमाद्वारे अकस्मात हृदयरोग या विषयावर प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणसत्राचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संचालक गणेश रामदासी, संचालक दयानंद कांबळे यांच्यासह महासंचालनालयाचे संपूर्ण मनुष्यबळ व राज्यभरातील पत्रकार सहभागी होणार आहेत.

या प्रशिक्षणानंतर आय केअरचे डॉ. यश लोखंडवाला (हृदयरोग तज्ज्ञ), डॉ.ब्रायन पिंटो (कार्डियोलॉजिस्ट), डॉ.किंजल गोयल (मानसोपचारतज्ज्ञ) हे यावेळी अकस्मात हृदयरोग या विषयावर मार्गदर्शन करतील व सहभांगीच्या प्रश्नांना उत्तरेही देतील.आकस्मित हृदयरोगाच्या झटक्याने होणारा मृत्यु ही आता नेहमीचीच बाब झाली आहे. मात्र हृदयविकाराचा झटका आल्यावर तातडीने उपाययोजना केल्यास मृत्यु टाळता येऊ शकतो. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी ‘राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहा’ निमित्त या प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात आले असून या ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ सर्वांनाच होणार आहे.

या कार्यक्रमात दूरदृश्य माध्यमाद्वारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकारी आणि त्या-त्या जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच तो महासंचालनालय व अधिनस्त कार्यालयांच्या ट्विटर हँडलवर सर्व जनतेस लाईव्ह पाहता येणार आहे.अचानक हृदयविकाराचा झटका येणाऱ्या पीडीतांना वैद्यकियदृष्ट्या मेंदू मृत होण्यापासून बचाव करण्यासाठी योग्यवेळी सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) म्हणजेच हाताने हृदयदाब व तोंडाने श्वासोच्छवास देणे शक्य तितक्या लवकर सुरू करणे गरजेचे आहे. याबाबतची अधिक माहिती या सप्ताहात नागरिकांना दिली जाणार आहे. याचबरोबर सीपीआर आणि एईडी मशीनचा वापर करण्याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरून आपल्या जवळची व्यक्ती किंवा नातेवाईकाचे प्राण वाचविण्यास सहकार्य करता येणार आहे.

या प्रशिक्षण सत्राचे थेट प्रसारण मा.व.ज. च्या ट्विटर हँडलवर MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR): https://twitter.com/MahaDGIPR याद्वारे पाहता येईल. राज्यातील सर्व माध्यमकर्मी यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु

Next Post

रस्त्यांमधील खड्डे भरण्याचे निकृष्ट काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करा -पालकमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
रस्त्यांमधील खड्डे भरण्याचे निकृष्ट काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करा -पालकमंत्री एकनाथ शिंदे

रस्त्यांमधील खड्डे भरण्याचे निकृष्ट काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करा -पालकमंत्री एकनाथ शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo