Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कामांना वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कामांना वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

भूमिगत विद्युत वाहिन्या, बंधारे, निवारे प्राधान्याने उभारणार

मुंबई दि. ८ : जागतिक बँक सहाय्यित राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत ३९७.९७  कोटी रुपयांची कामे  किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सुरू असून ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा आपत्तीला सामोरे जाण्यासाठी  ही  कामे त्वरित सुरू करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले

Maha Info Corona Website

जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प, राज्य प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पांतर्गत समुद्र किनारी जिल्ह्यांच्या भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे यावर भर दिला.  रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहर, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, पालघर जिल्ह्यातील सातपाडी येथील २०३.७७ कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. सर्व नियोजित भूमिगत विद्युतवाहिनी कराराला वेळेत पुरस्कार देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यामूळे अतिरिक्त भूमिगत विद्युतवाहिन्यांची कामे करण्याकरिता ३९० कोटी रुपयांना तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मालवण ९० कोटी, अलिबाग २५ कोटी, रत्नागिरी २०० कोटी आणि सातपाडीसाठी ३५ कोटी रुपये विद्यमान कामांना वाढविण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.

या प्रकल्पांतर्गतच खार प्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठीही ५५.२२ कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील नारवेल बेनवले साठी ४४.४० कोटी, कचली पिटकरी १०.८२ कोटी देण्यात आले आहेत.

आपत्तीपूर्व प्रणाली साठी (EWDS) ५३ कोटी रुपये देण्यात आले असून या प्रकल्पांतर्गत आपत्तीपूर्व प्रणालीची निविदा प्रकाशित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

११ ठिकाणी निवारे उभारणार

किनारपट्टीच्या भागात ११ निवारे सध्या उभारण्यात येणार आहेत अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली. याशिवाय ३० निवारे आवश्यक असून त्यासाठीही तरतूद उपलब्ध करून घेण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिमेंटचा स्लॅब

नुकत्याच आलेल्या चक्रीवादळात सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान झाले व ती उडून गेली. परंतु कौलारू घरे शाबूत राहिली. आता जी घरे पूर्ववत उभी करायची आहे त्यावर पक्का सिमेंटचा स्लॅब टाकण्यात येणार आहे अशी माहितीही देण्यात आली.

वीज पडून नुकसान टाळण्यासाठी

वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी वारंवार वीज पडण्याचा धोका असलेल्या भागांमध्ये ‘लाइटनिंग अरेस्टर’ बसविण्याबाबत लवकरात लवकर कारवाई व्हावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

कोकण किनारपट्टीला नेहमी चक्रीवादळांचा धोका असतो. कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांसाठी चक्रीवादळापासून संरक्षणासाठी जे जे प्रकल्प आणता येतील ते आणले जातील. जागतिक बँकेच्या सहाय्याने सध्या सुरू असलेले विविध प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महिंदळे येथील गरीब कुटुंबाला गावातील गाव गुंडांकडून अमानुष मारहाण; विनयभंग सह मारहाण व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Next Post

जिल्ह्यातील कोरोना बाधित ११६५ पैकी ५५६ रुग्ण कोरोना मुक्त तर ४८३ रुग्णांवर उपचार सुरु 

Next Post
कोरोना संशयित २५१ व्यक्तींचे अहवाल प्राप्त-१ पॉझिटिव्ह;२५० निगेटिव्ह

जिल्ह्यातील कोरोना बाधित ११६५ पैकी ५५६ रुग्ण कोरोना मुक्त तर ४८३ रुग्णांवर उपचार सुरु 

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo