Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रुसा अंतर्गत २६.५१ कोटी अनुदानाचे वाटप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई(प्रतिनिधी)- राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान अंतर्गत रूसा सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांच्या समवेत आढावा बैठकीत रूसा अंतर्गत 26.51 कोटी अनुदानाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत रूसा अंतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. रूसा अंतर्गत अपुर्ण कामे विहित कालावधीत पूर्ण करून कामाची गुणवत्ता राखणे तसेच पारदर्शकता ठेवण्याबाबत विद्यापीठ व महाविद्यालयांना आवाहन करण्यात आले.नवीन शैक्षणिक धोरण, महाविद्यालयीन स्वायत्ता या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित प्राचार्य व प्रतिनिधीना मार्गदर्शन करण्यात आले.

रूसा अंतर्गत प्राप्त शैक्षणिक उपकरणांचा इतर महाविद्यालये व विद्यार्थी यांना देखील लाभ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना यावेळी करण्यात आल्या. रूसा 3.0 अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कामे हाती घ्यावी. तसेच सर्व महाविद्यालय व विद्यापीठ यांनी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत सहभागी होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Team Satymev Jayate

Previous Post

राज्यात ५०५१ कोटींचे गुंतवणूक करार; ९ हजार जणांना नोकरीची नवी संधी -उद्योगमंत्री

Next Post

अमळनेरात थकबाकीदारांचे धाबे दणाणले; पहिल्याच दिवशी पावणेचार लाखांची वसुली!

Next Post

अमळनेरात थकबाकीदारांचे धाबे दणाणले; पहिल्याच दिवशी पावणेचार लाखांची वसुली!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo