Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेडिओ मनभावन च्या बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रमाला मिळाला मोठा प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि.13-  युनिसेफ व एस बी सी 3 च्या सहयोगाने रेडिओ मनभावन 90.8 एफ. एम. ने ग्रामपंचायत वावडदा येथे, बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बालविवाहचे परिणाम त्या निरागस मुलीला भोगावे लागतात ज्या वयात तिला शिकायचं असत अश्या वयात लग्न करणे म्हणजे कायद्याने गुन्हातर आहेच पण एक पिढी बरबाद होते त्याचे जबाबदार कोण? असा प्रश्न येवलेकर  जिल्हा समन्वयक चाईल्ड लाईन,जळगाव यांनी उपस्थित करताच काही क्षण शांतता पसरली होती. सावित्रीबाई चे फोटो फक्त जयंती पुण्यतिथी साठीच वापरायचे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. क्रांती एका दिवसात घडत नसते. सावित्री च्या तुम्ही लेकी आहात तेव्हा संकल्प करा या पुढे मुलीचे वय 18 च्या समोर व मुलाचे वय 21 असल्याशिवाय लग्न होऊ देणार नाही आपलं गाव या विचाराला धरून एकजूट करा असं आवाहन त्यांनी उपस्थिती स्त्री पुरुषांना केल.


या प्रसंगी रेडिओ मनभावन चे केंद्र प्रमुख अमोल देशमुख ह्यांनीरेडिओ मनभावन केंद्र समाजाच्या समस्या कश्या प्रकारे मांडत आणि जनजागृती कशी केली जाते यावर प्रकाश टाकला व या कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. वावडदा गावचे सरपंच राजेश वाडेकर म्हणाले की रेडिओ मनभावन  अल्पवधीत प्रसिद्ध झाले असून समाज मनाचा ठाव घेत आहे मागील 2-3 महिन्यापासून मी पाहतोय रेडिओ च्या माध्यमातून बालकांचे गर्भवती, स्तनदा मातांचे प्रश्न व त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन या केंद्राच्या माध्यमातून होते आहे ही समाजासाठी एक संधी आहे.


मागील 2 वर्षांपासून वावडदा गावात बालविवाह होत नाहीत व पुढेही होऊ नयेत म्हणून आम्ही वावडदावासी प्रयत्न करत राहू आणि यशस्वी होऊ हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंगलाबाई गोपाळ, प्रतिभा शिंदे,मीना पवार यशोदा वाघ,राजू शिंदे, कांबळे गुरुजी, सरुबाई जाधव,अनिता धनगर,अरुणा मस्के, प्रतिभा शिंपी,यशोदा वाघ, मीना पवार, शोभा जाधव, संजय राऊत, रवींद्र चिंचोले, दीपक मस्के, विजय पवार, सुभाष गोपाळ, सुमित पाटील,भानुदास भोमा पाटील,आदी आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश वाडेकर सरपंच आणि अमोल देशमुख केंद्रप्रमुख रेडिओ मनभावन यांनी प्रयत्न केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एकलव्य क्रीडा संकुलातील आकांक्षा करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

Next Post

बिबट्याच्या हल्लात वासरी ठार शेतकऱ्यामध्ये भिती

Next Post

बिबट्याच्या हल्लात वासरी ठार शेतकऱ्यामध्ये भिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo