Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेल्वे प्रवाशांना झटका;प्रवाशांना द्यावे लागणार स्टेशन युजर चार्ज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/01/2022
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read
रेल्वे प्रवाशांना झटका;प्रवाशांना द्यावे लागणार स्टेशन युजर चार्ज

नवी दिल्ली -(न्यूज नेटवर्क)- नव्या वर्षात रेल्वे प्रवाशांच्या खिशावरील भार वाढणार आहे. लवकरच तुम्हाला ट्रेनने (Train) प्रवास करण्यासाठी ५० रुपये जास्त शुल्क द्यावे लागणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railway)विमानतळाप्रमाणेच विकसित केलेल्या रेल्वे स्टेशनवर विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट फी (Station Development Fee)आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क प्रवाशांना युजर चार्जच्या रुपात द्यावे लागणार आहे.

१० ते ५० रुपये असेल शुल्क

विमानतळाच्या धर्तीवर विकसित करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनवर आता प्रवाशांकडून युजर चार्ज लावला जाणार आहे. हे शुल्क १० ते ५० रुपयांच्या दरम्यान असणार आहे. देशभरात ४०० रेल्वे स्टेशनना आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुविधाप्रमाणेच विकसित करण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाकडून केला जातो आहे. यामध्ये बहुतांश रेल्वे स्टेशन हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रकारातील आहेत. गांधीनगर आणि भोपालचे रानी कमलावती रेल्वे स्टेशन याआधीच विकसित होऊन तयार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन देखील केले आहे.

रेल्वे बोर्डाने दिली मंजूरी

रेल्वे बोर्डाकडून प्रवाशांवर युजर चार्ज लावण्यास मंजूरी देण्यात आली आहे. वेगवेगळ्या श्रेणीमधून प्रवास करणाऱ्या सर्व लोकांवर चार्जदेखील वेगवेगळा लागणार आहे. याचा समावेश तिकिटातच केला जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यतचा युजर चार्ज लागणार आहे.

विमानतळावर लावला जातो असा शुल्क

अनारक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्यांसाठी हे शुल्क १० रुपये असणार आहे. तर स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी हे शुल्क २५ रुपये आणि एसीमधून प्रवास करणाऱ्यांसाठी हे शुल्क ५० रुपये असणार आहे. याच प्रकारचे शुल्क देशात विमानतळावरदेखील घेतले जाते. अर्थात रेल्वे मंत्रालयानुसार हा युजर लार्ज केव्हापासून लागू होणार याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. प्लॅटफॉर्म तिकिट विकत घेणाऱ्यांसाठीदेखील हे शुल्क १० रुपये इतके असणार आहे. विमानतळाप्रमाणे विकसित करण्यात आलेल्या स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांकडून निश्चित शुल्काच्या ५० टक्के रक्कम घेतली जाणार आहे.

रेल्वे विभागाने मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यात ३४६ ट्रेन पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तर २० ट्रेनना अंशत: रद्द करण्यात आले आहे. रेल्वे १७ गाड्यांच्या मार्गात बदल केले आहेत. तर १३ गाड्यांचे रिशेड्युलिंगदेखील केले आहे. देशातील कोरोना संक्रमण आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या संसर्गामुळे रेल्वे प्रवाशांना कोरोना निर्बंधांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. रेल्वेकडून प्रवाशांना रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक तपासण्याचीही सूचना करण्यात येते आहे. त्यामुळे तुम्हीदेखील जर प्रवासाचे नियोजन करत असाल तर रेल्वेचे वेळापत्रक नक्की तपासून घ्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोविडला रोखण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून निर्बंध लागू

Next Post

जननचक्राची ओळख – भाग १

Next Post
जननचक्राची ओळख – भाग १

जननचक्राची ओळख – भाग १

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo