Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी; अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
लग्नानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी; अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांचे आवाहन

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जळगाव जिल्ह्यात लग्न सराई सुरू झाली आहे. यानिमित्त जेवणाचा ठेका देताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील (अन्न) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे. श्री. पाटील यांनी म्हटले आहे, लग्नानिमित्त जेवणावळीचे कंत्राट हे कॅटरिंग व्यावसायिकास देण्यात येते.

लग्नानिमित्त होणाऱ्या जेवणावळीत अनेकजण जेवण करतात. त्यामुळे या अन्नाचा दर्जा तसेच त्याची तयार करण्याच्या कार्यप्रणालीबाबत अन्न व औषध प्रशासनाने आवाहन केले आहे. त्यानुसार लग्नानिमित्त जेवणाचे कंत्राट हे अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत योग्य परवाना असलेल्या कॅटरिंग व्यावसायिकांनाच द्यावे. जेथे कॅटरिंग व्यावसायिक हा अन्न पदार्थ तयार करतो ती जागा आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व आरोग्यदायी असावी. लग्नामध्ये जेवण तयार करताना कॅटरिंग व्यावसायिकाने अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केलेली असावी.

अन्न पदार्थाचे वितरण करणाऱ्यांना ॲप्रॉन, ग्लोव्हज व डोक्याला टोपी पुरविलेली असावी. जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी ही स्वच्छ असावीत. अन्नपदार्थ ज्या ठिकाणी तयार केले जातात तेथे वापरण्यात येणारे पाणी हे पिण्यास योग्य असावे.

कॅटरिंग व्यावसायिकाने जेवण तयार करताना वापरण्यात येणारे दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, खवा तसेच गोड पदार्थांचा दर्जाबाबत खात्री करावी व त्याचे वेळेतच सेवन होईल याबाबत लक्ष पुरवावे. तयार अन्न पदार्थामध्ये खाद्यरंग वापरला जावू नये याबाबत देखील खात्री करावी. जेवण तयार करण्याकामी लागणारा कच्चा माल हा दर्जेदार वापरावा. याबाबत देखील लक्ष पुरवावे. लग्नाच्या ठिकाणी वाढणारे जेवण हे कॅटरिंग व्यावसायिकाने नीटनेटके झाकून तसेच योग्य त्या तापमानास ठेवावे.

शिल्लक अन्न पदार्थ हे त्याकरीता कार्यरत असलेल्या एजन्सीला देण्यात यावे. तसेच उष्टे/ शिल्लक अन्न पदार्थाची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी. वरील ठळक मुद्यांचे कॅटरिंग व्यावसायिकाने पालन केले आहे किंवा कसे हे लग्ननिमित्त जेवण बनविण्याचे कत्राट देताना नागरिकांनी लक्ष द्यावे. जेणेकरुन अन्न विषबाधासारख्या घटना घडणार नाहीत, असेही सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत 37 (3) कलम जारी

Next Post

कौमी एकता सप्ताहातंर्गत कामगार कल्याण केंद्रात अल्पसंख्यांक दिवस उत्साहात साजरा

Next Post
कौमी एकता सप्ताहातंर्गत कामगार कल्याण केंद्रात अल्पसंख्यांक दिवस उत्साहात साजरा

कौमी एकता सप्ताहातंर्गत कामगार कल्याण केंद्रात अल्पसंख्यांक दिवस उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d