Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लसीकरणासाठी कठोर उपायांऐवजी जनतेच्या पुढाकारासह प्रशासनाला घरोघरी जाण्याचे आवाहन -मंत्री छगन भुजबळ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात एकूण ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करणार -पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- गेल्या दोन महिन्यात हजाराच्या घरात असलेली रूग्णसंख्या नवरात्र, दसरा दिवाळी नंतरही ४०० च्या आसपास स्थिर असून हे चांगले संकेत असून यात जिल्ह्यातील राबवलेल्या लसीकरण मोहिमेचा मोठा परिणाम आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार आहे. तसेच लसीकरणासाठी कठोर उपाययोजना करण्याची इच्छा नाही. परंतु जनतेने सहकार्य न केल्यास तशी पावले उचलावी लागतील, त्यामुळे जनतेने स्वत:हुन पुढाकार घेण्यासह प्रशासनाने ही मोहीम घरोघरी पोहोचवावी असे कळकळीचे आवाहन आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिंग आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, ११ सप्टेंबर २०२१ रोजी रूग्णसंख्या ९०४ इतकी होती. २३ सप्टेंबर २०२१ रोजी ती १ हजार ३५ झाली. २४ ऑक्टोबरला रूग्णसंख्या ७१७ होती, त्यानंतर ही संख्या ६५० ते ७०० च्या दरम्यान असायची ती कमीकमी होत आज रोजी ४६१ पर्यंत कमी झालीय. सण, उत्सवांच्या कालावधीनंतरची ही कमी होणारी आकडेवारी चांगले संकेत देणारी व कोरोनामुक्तीसाठी आशादायक चित्र निर्माण करणारी आहे. अर्थात यांत जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणीकरण होत असलेले लसीकरणाचा मोठा वाटा आहे.

येणाऱ्या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणाला गती देण्यासाठी औरंगाबादसारख्या कुठल्याही कठोर उपाययोजना राबवण्याची शासन प्रशासनाची इच्छा नसून मात्र जनतेने सहकार्य न केल्यास नाईलाजास्तव त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. त्यासाठी जनतेने स्वतः पुढाकार घेवून या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे आवाहन करताना ग्रामीण व आदिवासी बहुल भागात घरोघरी लसीकरण पोहोचविण्याकरिता प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य प्रशासनाला यावेळी दिले आहेत.

Team Satymev Jayate

Previous Post

विद्यार्थ्यांच्या हितालाच शासनाचे प्राधान्य -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Next Post

शालेय शिक्षणातील सुधारणांसाठी जगभरातील नामांकित आयटी कंपन्यांच्या सहकार्याने राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन

Next Post
दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार

शालेय शिक्षणातील सुधारणांसाठी जगभरातील नामांकित आयटी कंपन्यांच्या सहकार्याने राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo