Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लसीकरण सत्राचे प्रभाग निहाय नियोजन करा -अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
लसीकरण सत्राचे प्रभाग निहाय नियोजन करा -अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

मुंबई(प्रतिनिधी)- राज्यातील शहरातील कोविड-19 लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी प्रभाग निहाय अथवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण सत्राचे नियोजन करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या आहेत.

राज्यात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी कवच कुंडल अभियान राबविण्यात येत आहे. येत्या चौदा ऑक्टोबर 2021 पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने डॉ. व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत.

त्यांनी दिलेल्या सूचना पुढीलप्रमाणे:- सर्व आयुक्तांनी कोविड टास्क फोर्सची बैठक घ्यावी. बैठकीत महसूल, शिक्षण, महिला बालविकास, नगरविकास अशा विविध विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना निमंत्रित करण्यात यावे, लसीकरण सत्राचे प्रभागनिहाय अथवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय नियोजन करावे, कार्यक्षेत्रातील लोकसंख्या आणि लसीकरण न झालेल्या नागरिकांच्या लोकसंख्येनुसार लसीकरण सत्राचे नियोजन करावे, एका प्रभागाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाचे लसीकरण करावे.

पहिल्या डोसचे प्राधान्याने आणि दुसरा डोस देय असलेले लसीकरण करावे, लसीकरणाकरिता डॉक्टर, अधिपरिचारिका, आरोग्यसेविका, इंटर्नस यांनी व्हैक्सिनेटर म्हणून काम करावे, लसीकरण सत्रापुर्वी दोन दिवस अगोदर जनजागृती करावी. त्यासाठी दवंडी देणे, गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी उद्घोषणा, समाजमाध्यमे यांचा वापर करावा, उपलब्ध लसींच्या साठ्यानुसार पुढील तीन दिवसांसाठी सत्रांचे नियोजन करावे.

Team Satymev Jayate

Previous Post

दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र कोविड योद्धा सन्मान प्रदान

Next Post

विरावली ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

Next Post
विरावली ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

विरावली ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo