Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर ग्रामिण शिबिर गारबर्डी / पाल येथे संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/01/2025
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
Reading Time: 1 min read
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर ग्रामिण शिबिर गारबर्डी / पाल येथे संपन्न


जळगाव -(प्रतिनिधी)जानेवारी 2024 मंगळवार:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबीर आणि बी.एस.डब्ल्यू. प्रथम वर्ष व एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्ष या वर्गाचे ग्रामिण शिबिर दिनांक15 ते 21 जानेवारी 2025 या कालावधीत गारबर्डी आणि पाल ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिराचा समारोप दि. 21 जानेवरी 2025 रोजी संपन्न झाले.

सदर शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ माननीय प्र. कुलगुरू डॉ. एस.टी.इंगळे सर यांच्या शुभहस्ते झाले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. पी.आर. चौधरी सर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सातपूडा विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक झांबरे, सरपंच रतन बारेला ई. उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुनिता चौधरी यांनी केले. प्रास्ताविक डॉ.कल्पना भारंबे यांनी केले. तर आभार डॉ. भारती गायकवाड यांनी केले.

तसेच समारोप कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष स्थानी शिबिर समन्वयक म्हणून डॉ. वाय.जी. महाजन सर होते. तर प्रमुख अतिथि म्हणून मा. सुधाकर झोपे सर यांच्या प्रमुख उपस्थित झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिमा पाटिल यांनी केले. प्रास्ताविक डॉ. कल्पना भारंबे यांनी केले. शिबिरार्थी विद्यार्थी महेश अहिरे, व इतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार डॉ. कल्पना भारंबे यांनी केले.

सदर शिबिर प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनातील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी गारबर्डी येथे सरपंच रतन बारेला यांच्या उपस्थीतीत वनराई बंधारा तयार केला. तसेच गारबर्डी आदीवीसी गावातील रस्ते सफाई केली. तसेच याच गावात पोस्टर प्रदर्शन, वृक्षारोपन, सामाजिक सर्वे, आणि पथनाट्य यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गावातील सर्व नागरीकांनी व ग्रामसेवक आणि सरपंच व विविध पदाधिकारी आणि कृषि विज्ञान केंद्र पाल येथिल कर्मचारी व पदाधिकारी यांनी सहकार्य केले. तसेच ग्रामिण शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांनी पाल येथे जलसंधारण आणि मृदा संधारणाचे कामे केले आहेत. तसेच आदिवासी लोकांची वस्ती या गावातील विविध सामाजिक समस्या याविषयी माहीती संकलीत करून त्यावर आधारीत संशोधन कार्य पूर्ण केले आहे. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयावर आधारीत गटचर्चा केल्या.

विशेष ग्रामिण शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना बौध्दिक सत्रात विविध डीजीटल लिटर्सी आणि आजचा युवक, राष्ट्रवाद आणि आजचा यूवक, शास्वत विकास आणि मानसिकता, पर्यावरण आणि सेंद्रीय शेती यासारख्या विविध विषयावर मार्गदर्शन केले. साधन व्यक्ती म्हणून डॉ. राजेंद्र राजपूत, डॉ. सी.पी. लभाणे, डॉ. भूषण राजपूत, डॉ. वाय.जी. महाजन, डॉ.सुनिता चौधरी, डॉ.कल्पना भारंबे यासारख्या विविध तज्ञ साधन व्यक्ताने मार्गदर्शन केले.

सदर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरासाठी डॉ. भारती गायकवाड, डॉ.अशोक हनवते, डॉ. दिपक महाजन यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तर सदर ग्रामिण शिबिरासाठी समन्वयक म्हणून डॉ. वाय. जी. महाजन यांनी तर सहसमन्वयक म्हणून डॉ. सुनिता चौधरी, डॉ. भूषण राजपूत, डॉ. कल्पना भारंबे, किशोर भोळे यांनी सह समन्वयक म्हणून कामकाज केले, सदरील शिबिरसाठी 130 विद्यार्थी शिबिरार्थी म्हणून सहभागी झाले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वामी विवेकानंद व हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धा संपन्न

Next Post

शहर तेली समाजातर्फे लोहारा येथील कुमारी पल्लवी चौधरी हिचा सत्कार…

Next Post
शहर तेली समाजातर्फे लोहारा येथील कुमारी पल्लवी चौधरी हिचा सत्कार…

शहर तेली समाजातर्फे लोहारा येथील कुमारी पल्लवी चौधरी हिचा सत्कार...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo