Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘वंदे मातरम्’ नित्यनूतन, प्रेरणादायी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
‘वंदे मातरम्’ नित्यनूतन, प्रेरणादायी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. 25 : वाल्मिकी रामायण तसेच तुलसीदासांच्या रामचरित मानसप्रमाणे बंकीम चंद्र यांचे ‘वंदे मातरम्’ हे काव्य व त्याचे सांगीतिक सादरीकरण कधीही जुने न होणारे असे नित्यनूतन व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिवंगत गायक-संगीतकार विनायक देवराव अंभईकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘संपूर्ण वंदे मातरम्’वर आधारित नव्या सांगीतिक रचनेचे प्रकाशन  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी संपूर्ण वंदे मातरम् रचनेचे गायक मंदार आपटे, गायिका स्वाती आपटे व अर्चना गोरे, निर्माते नचिकेत अंभईकर,  दिवंगत विनायक अंभईकर यांचे कुटुंबीय, उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, एजियाज फेडरलचे उपाध्यक्ष राजेश आजगावकर, वन्दे मातरम् च्या नृत्य दिग्दर्शिका पूजा पंत, पखवाज वादक चंद्रशेखर आपटे, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

‘आनंदमठ’ कादंबरी लिहिली गेली त्यावेळी बंकीम चंद्र यांनी त्यातील वंदे मातरम् ही रचना अजरामर होईल अशी कल्पना देखील केली नसेल असे सांगून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ‘वंदे मातरम्’ हे प्रेरणा गीत ठरले तसेच अनेक क्रांतिकारक ‘वंदे मातरम्’ चा उद्घोष करीत वधस्तंभावर गेले असे राज्यपालांनी सांगितले.

वंदे मातरम् या गीताला शेकडो संगीतकारांनी संगीतबद्ध केल्याचे नमूद करून विष्णू सहस्त्रनामाप्रमाणे या रचना नेहमीच प्रेरणादायी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी मंदार आपटे व अर्चना गोरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘ने मजसी ने’ हे गीत सादर केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाचोरा ; मराठा महासंघ अध्यक्षपदी शिवाजी शिंदे

Next Post

भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशक्षमता १०० करण्यास परवानगी

Next Post
जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश

भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशक्षमता १०० करण्यास परवानगी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d