Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडील बरे झाल्याबद्दल पुत्रांचा कृतज्ञता म्हणून शासकीय रुग्णालयाला ३१ हजारांचा धनादेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
वडील बरे झाल्याबद्दल पुत्रांचा कृतज्ञता म्हणून शासकीय रुग्णालयाला ३१ हजारांचा धनादेश

जळगाव : ऐन मध्यरात्रीची वेळ…अशा वेळी वडिलांना अत्यवस्थ वाटू लागते…दवाखाने फिरफिरची वेळ… अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रात्री २ वाजता वडील दाखल झाले आणि यशस्वी उपचार घेत १२ दिवसांनी बरे होऊन घरी परतले. म्हणून मुलांनी वैद्यकीय सेवेपोटी कृतज्ञता म्हणून चक्क ३१ हजार रुपयांचा धनादेशच अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सुपूर्द केला.

शहरातील कालिकामाता मंदिर परिसरातील ओंकार नगरातील रहिवासी राजेश शामराव चौधरी यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना १० एप्रील रोजी वेळेवर त्यांच्या मुलांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळेवर दाखल झाल्यावर व योग्य ते उपचार मिळाल्यामुळे राजेश चौधरी यांना बरे वाटू लागले. वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना २२ एप्रिल रोजी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला.

वडिलांना मिळालेल्या उपचारामुळे कृतज्ञता म्हणून त्यांची मुले लोकेश, गोपाल व मुलगी मेघा यांनी वैद्यकीय सेवेसाठी रुपये ३१ हजार रुपयांचा धनादेश गुरुवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्द केला. याबद्दल अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विजय गायकवाड, अधिसेविका कविता नेतकर आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळल्यास करणार सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

Next Post

शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याचा अधिष्ठात्यांनी घेतला आढावा

Next Post

शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याचा अधिष्ठात्यांनी घेतला आढावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo