Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वन महोत्सवात सवलतीच्या दरात रोपे मिळणार वनप्रेमींनी लाभ घेण्याचे वन विभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
वन महोत्सवात सवलतीच्या दरात रोपे मिळणार वनप्रेमींनी लाभ घेण्याचे वन विभागाचे आवाहन

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 –
वनमहोत्सवात नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी जळगाव वनविभागाकडून 4 लाख 21 हजार रोपे तसेच एक लाख औषधी रोपांचा सवलतीच्या दरात पुरवठा करण्यात येणार आहे. वृक्षप्रेमी नागरिक, शासकीय, निमशासकीय यंत्रणा यांनी याचा लाभ ध्यावा. असे आवाहन जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक डिगंबर पगार यांनी केले आहे .

वन विभागातर्फे दरवर्षी 15 जून ते 30 सप्टेंबर हा कालावधी वनमहोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो .या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्यादृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. वृक्षलागवड व संगोपन हा लोकांचा कार्यक्रम व्हावा. त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून देता यावे. यादृष्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा केला जातो.

सन 2019 -20 या वर्षातील अनुभव तसेच जनतेचा लक्षणीय प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना सन 2020-21 या आर्थिक वर्षातही 15 जून ते 30 सप्टेंबर, 2020 या कालावधीत पुढे चालू ठेवण्यास व ती प्रभावीपणे राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याअनुषंगाने शासकीय यंत्रणा, नागरिकांना व वृक्षप्रेमींना अल्पदरात रोपांचा पुरवठा या कालावधीत करण्यात येणार आहे .

या वन महोत्सव कालावधीत लहान पिशवीतील प्रति रोपासाठी 8 रूपये दर आकारण्यात येणार असून सर्वसाधारण कालावधीतील या रोपांचा हा दर 15 रूपये आहे. तर मोठ्या पिशवीतील रोपांचा दर 40 रूपये असून सर्वसाधारण कालावधीत या रोपांचा दर 75 रूपये असे आहेत. जळगाव वनविभागाकडे आज चार लाख 21 हजार रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत तसेच एक लाख औषधी रोपे देखील लागवडीसाठी उपलब्ध आहेत.

तरी शासकीय यंत्रणा, निमशासकीय यंत्रणा, वृक्षप्रेमी नागरिक यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या सवलतींचा लाभ घेऊन वृक्ष लागवड करावी. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत सन 2019 मध्ये लागवड केलेल्या रोपांपैकी मेलेल्या रोपांच्या जागी नवीन रोपांची शासन निर्णय क्रमांक साववि-2020/प्र.क्र /43 /फ-११, दि. 15 जून, 2020 अन्वये मागणी केल्यास 20 टक्के रोपे मोफत उपलब्ध करून देण्यात येतील. या सवलतीचाही लाभ घेण्याचे आवाहन जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक श्री. डिगंबर पगार यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर तालुका शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्ष सह सचिव यांच्यावर मालमत्ता अपहाराचा गुन्हा दाखल

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २६८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव जिल्ह्यात आज २६८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo